Home बुलढाणा शेतात वीज पडल्याने महिलेचा जागीच मृत्यू; तीन गंभीर जखमी

शेतात वीज पडल्याने महिलेचा जागीच मृत्यू; तीन गंभीर जखमी

112

आशाताई बच्छाव

1000787929.jpg

शेतात वीज पडल्याने महिलेचा जागीच मृत्यू; तीन गंभीर जखमी
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :-शेलू शेतात काम करतांना अंगावर वीज पडल्याने शेतकरी महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना नजिकच्या जुवाडी येथे घडली. सदर दुर्घटनेत तीन शेतमजूर महिला गंभीर तर दोघी किरकोळ जखमी झाल्या आहेत. मंदा प्रभाकर वाघमारे (वय ५५) रा. जुवाडी असे मृतक महिला शेतकऱ्याचे नाव आहे. यातील जखमींना सेलूच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती यावेळी स्थानिकांनी दिली.
जुवाडी येथील शेतकरी प्रभाकर वाघमारे आपल्या
सौभाग्यवतीसह पाच महिला शेतमजूर घेऊन गुरुवारी
सकाळी शेतातील कामानिमित्त गेले होते. दरम्यान
दुपारी ४ वाजताच्या सुमारास जुवाडी परिसरातील शेतशिवारात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. यावेळी सगळेच शेती कामात व्यस्त असतांना अचानक शेतात वीज कोसळली. यात मंदा प्रभाकर वाघमारे यांचा जागीच मृत्यू झाला तर अर्चना तुकाराम दाभेकर (वय ३६), किरण लती वाल्हे (वय ३०) आणि उर्मिला दिलीप कोल्हे (वय ३२) तीनही रा.जुवाडी यांना वीजेचा जबर धक्का बसल्याने त्या गंभीर जखमी झाल्यात. दरम्यान दोन महिला मजूरांना देखील यावेळी किरकोळ इजा झाल्याचे सांगितले जाते. सदर घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना तत्काळ सेलूच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

Previous articleदोन व्यक्ती गेले वाहून ! -मृतदेह सापडला नाही! -नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन करते तरी काय ?
Next articleखळबळ ! विवाहीत महिलेवर धारदार शस्त्राने वार .. महिला जागीच ठार ! संशयीत पतीला पोलिसांनी घेतले ताब्यात !
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.