Home भंडारा इटगाव पुनर्वसन( पागोरा )भंडारा पवनी मुख्य मार्गावर खड्ड्यांच्या भरतो बाजार

इटगाव पुनर्वसन( पागोरा )भंडारा पवनी मुख्य मार्गावर खड्ड्यांच्या भरतो बाजार

41
0

आशाताई बच्छाव

1000787907.jpg

इटगाव पुनर्वसन( पागोरा )भंडारा पवनी मुख्य मार्गावर खड्ड्यांच्या भरतो बाजार

आमदार ,खासदार ,प्रशासनाचे अधिकारी यांचे या खड्ड्या बाजारांकडे दुर्लक्ष

संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी) पहेला ते अड्याळ कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर इटगाव पुनर्वसन (पागोरा) या ठिकाणी खड्ड्यांचा बाजार भरला असून त्या ठिकठिकाणी असलेल्या खड्ड्याच्या बाजारातून आमदार ,खासदार ,जिल्हा प्रशासनाचे अधिकारी रोज आपल्या वाहनाने ये जा करीत असतात परंतु हे 100 मीटर असलेल्या खड्ड्यांकडे कोणत्याही जनप्रतिनिधी किंवा अधिकाऱ्यांचे लक्ष नाही. त्यामुळे हे जागोजागी असलेले खड्डे अपघातास निमंत्रक ठरत आहेत. कोणाच्या जीव केव्हा जाईल हे सांगता येत नाही. म्हणून जिल्हा प्रशासनाने व जनप्रतिनिधी याकडे तात्काळ लक्ष देऊन ते जागोजागी बाजार भरलेले खड्डे तात्काळ बुजवून रस्त्याचे बांधकाम त्वरित पूर्ण करण्यात यावे अशी सर्वसामान्य जनतेची ओरड आहे. मागील चार महिन्यापासून या रस्त्यावर गाडी गिट्टी पाडून ठेवलेली आहे परंतु ठेकेदाराने अजून पर्यंत ते काम पूर्ण केलेले नाही. आता जनतेला रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.

Previous articleजाफराबाद पोलिसांनी केला खुलताबाद येथील खुनाचा उलगडा एक आरोपी अटकेत.
Next articleअपंग व्यक्तीला पॅन्ट आणि शर्ट चे वाटप करून अनोख्या पद्धतीने वाढदिवस केला साजरा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here