Home उतर महाराष्ट्र सोनंईला रामकथेचे आयोजन

सोनंईला रामकथेचे आयोजन

77
0

आशाताई बच्छाव

1000778683.jpg

सोनई/ नेवासा कारभारी गव्हाणे तालुका प्रतिनिधी– प्रभू रामाचा १४ मिनिट लग्न मुहूर्त टळला म्हणून १४ वर्ष वनवास भोगावा लागला असल्याचे सोनई येथे राम कथेत रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांनी सांगितले.
सोनईतील राम कथेचे वैशिष्ट्य म्हणजे संत महंतांची उपस्थिती, जगातील सर्वात मोठी श्रीमंती संस्कार असून सावत्र भावाचे प्रेम रामायणातच पहावयास मिळत असल्याचे सांगत
जीवनातील सर्व प्रश्नांची उत्तरे रामायणात मिळतात व लग्नाचे खरे मुहूर्त घटी व गोरज असल्याचे महाराजांनी सांगितले.
काटीका वध, यज्ञ रक्षण, अहिल्या उद्धार, धनुष्यभंग, परशुराम बिदाई, राम राज्याभिषेकाची तयारी, मंथरा पात्राचा उल्लेख, कैकयी व राजा दशरथ यांचा संवाद, वनवासात जात असतानाचा प्रसंग तसेच राम व भिल्ल केवटाच्या भेटीचे प्रसंगासह वर्णन केले.
कैकयीने दशरथ राजा कडून मागितलेल्या दोन वरा च्या पूर्ततेसाठी अयोध्येचे राज्य भरताला व रामाला १४ वर्षे वनवास मागितला दशरथ रूपी काम, कैकयी रुपी क्रोध व मंथरेचा लोभ अशा एकत्रीकरणाने रामराज्य १४ वर्षे लांबल्याचे सांगितले. प्रभू रामचंद्राचा जन्म कौसल्या पासून झाला असला तरी रामायणाचा जन्म कैकयी पासून झाल्याचा उल्लेख केला.
कुटुंबातील सासु -सुने विषयी सांगताना सुनेने सासूला आई समजावे तर सासुने सुनेला मुलगी समजले तर कुठलीही सासू वृद्धाश्रमात जाणार नाही यासाठी ही राम कथा ऐकायची आहे असे सांगत आपल्या जीवनातील प्रश्नांसाठी व आचरणासाठी रामायण असल्याचा उल्लेख केला.
राम कथेला आलेल्या श्रोत्यां विषयी महाराजांनी सांगितले की आम्हाला इतर ठिकाणी भाविकांना टाळ्या वाजवायचे सांगावे लागतात परंतु सोनई येथील भाविकांना आता “टाळ्या वाजवणे थांबवा” असं म्हणावं लागतं म्हणजेच सोनईचे श्रोते हे सोन्यासारखी आहेत.
केवट कथेसाठी ह भ प सुनील गिरी महाराज, विष्णू महाराज पिठोरे, अतुल महाराज आदमने, संजय महाराज सरोदे, रामनाथ महाराज पवार, नंदकिशोर महाराज चव्हाण, चंद्रभान महाराज म्हसलेकर, घोडेगाव चर्चचे धर्मगुरू यांच्यासह मोठ्या संख्येने महाराज मंडळी व भाविक वर्ग उपस्थित होते.
लग्न मुहूर्त वेळ हि वराती मुळे टळत असल्याने त्यासाठी गावोगावी एकत्र येऊन ‘दंडुके मंडळ’ तयार करावे व लग्न मुहूर्त वेळेतच होण्यासाठी दंडुके मंडळांनी प्रयत्न करावा असे कळकळीचे आवाहन महाराजांनी व्यक्त केले.
रामायण कथा सोहळ्यासाठी सोनई व तालुक्यातील भाविकांची संख्या दररोज वाढत असून सोनई राम कथेला नुसती ‘गर्दी’ नाही तर येथील भाविक ‘दर्दी’ असुन यामुळेच कार्यक्रमाला भव्यता लाभत असल्याचे ढोक महाराजांनी सांगितले

Previous articleएसटी बस अस्वच्छ: आगार प्रमुखांना किती झाला दंड? अनेक बसेस मध्ये पान, गुटखाच्या पिचकाऱ्या, प्रवाशांना मनस्ताप.
Next articleजालन्यात पथविक्रेता समिती सदस्य निवडणूक बिनविरोध
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here