आशाताई बच्छाव
जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून खातेदारांना एटीएम वाटप सुरू
हिंगोली, श्रीहरी अंभोरे पाटील ब्युरो चीफ – दि जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून परभणी हिंगोली जिल्ह्यातील सर्व शेतकरी खातेदारांना बँकेद्वारे एटीएम वाटप सुरू करण्यात आले आहे . जिल्हा मध्यवर्ती बँक ही परभणी व हिंगोली जिल्ह्यातील सर्व शेतकरी लाभार्थ्याचा आत्मा आहे त्यामुळे शासनाच्या विविध योजनेअंतर्गत तसेच शासनाकडून दिल्या जाणाऱ्या शेतकरी लाभार्थ्यांना पिकाची नुकसान भरवावी पिक विमा खडणी तसेच सोसायटी आधीच्या माध्यमातून शेतकऱ्याला बँकेची मोठा संपर्क करावा लागत आहे शेतकऱ्याचा वेळ व ताण कमी करण्यासाठी बँकेचे चेअरमन सुरेश रावजी वरपूडकर साहेब व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुरुंदकर साहेब यांच्या नियोजनात सर्व हिंगोली परभणी जिल्ह्यातील शाखे अंतर्गत येणाऱ्या सर्व शेतकरी खातेदारांना याचा मोठा लाभ होणार आहे एकंदरीत एकूणच जिल्ह्यातील खातेदारांची संख्या दीड लाख एवढी आहे त्यामुळे शासनाच्या विविध योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या लाभा प्रत्येकाची वेळी शाखेमध्ये शेतकरी लाभार्थ्याची संख्या मोठी असल्याने त्या ठिकाणी शेतकऱ्यांबरोबरच बँकेतील कर्मचारी अधिकारी यांच्यावर कामाचा ताण वाढत असून त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना पैसे सुद्धा काढण्यासाठी शाखेच्या ठिकाणी रांग लावून थांबावे लागत आहे त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती शाखेच्या चेअरमन व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी हा घेतलेला निर्णय सर्व शेतकरी लाभार्थी यांना याचा मोठा फायदा होणार आहे.
त्यामुळे 13 सप्टेंबर पासून दोन्ही जिल्ह्यातील शाखा अंतर्गत एटीएम वाटप सुरू करण्यात आले आहे हे एटीएम वाटप 13 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर पर्यंत सुरू असेल व परभणी हिंगोली जिल्ह्यातील सर्व शाखा अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये 13 सप्टेंबर पासून ते 17 सप्टेंबर पर्यंत गाव पातळीवर एटीएम वाटप सुरू करण्यात आले आहे त्याचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा अशी माहिती बँकेचे चेअरमन तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एका पत्रकाद्वारे माहिती कळवली आहे.