Home बुलढाणा विविध ठिकाणी राज्य उत्पादन विभागातर्फे कारवाई मोहिमेत 27 गुन्ह्यासह 4 लाखांचा माल...

विविध ठिकाणी राज्य उत्पादन विभागातर्फे कारवाई मोहिमेत 27 गुन्ह्यासह 4 लाखांचा माल जप्त….

65

आशाताई बच्छाव

1000685159.jpg

विविध ठिकाणी राज्य उत्पादन विभागातर्फे कारवाई मोहिमेत 27 गुन्ह्यासह 4 लाखांचा माल जप्त….
युवा मराठा न्यूज बुलडाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :-बुलढाणा राज्य उत्पादन शुल्कतर्फे गेली दोन अवैध दारूविरोधात कारवाई करण्यात येत आहे. यात 27 गुन्ह्यांसह 4 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.अधीक्षक डॉ. पराग नवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 23 व 24 ऑगस्ट रोजी जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात आली. यात 26 वारस गुन्ह्यांसह 26 आरोपी, 388 लिटर हातभट्टी, 6624 लिटर रसायन, 83 लिटर देशी मद्य, 5.4 लिटर विदेशी मद्य यासह एकूण 3 लाख 99 हजार 470 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

निरीक्षक के. आर. पाटील यांनी बुलडाणा शहरातील भीलवाडा, आंबेडकर नगर, कैकाळीपुरा येथील अवैध हातभट्टीवर 5 वारस गुन्हे नोंदवून 122 लिटर हातभट्टी आणि 1918 लिटर रसायनासह 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. निरीक्षक श्री. बोज्जेवार आणि श्री. माकोडे यांनी भादोला, डोंगरखंडाळा येथे अवैध मद्य विक्री 6 वारस गुन्हे नोंदवून 108 लिटर हातभट्टी आणि 2272 लिटर रसायन आणि 15 लिटर देशी असा 1 लाख 10 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. निरीक्षक व्ही एम. पाटील यांनी मनसगाव, शेगाव, देवधाबा, मलकापूर येथे अवैध हातभट्टी व मद्यविक्रीचे 9 वारस गुन्हे नोंदविले. यात 158 लिटर हातभट्टी आणि 3418 लिटर रसायन आणि 10.17 लिटर देशी असा 1 लाख 67 हजार 785 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. निरीक्षक श्री. रोकडे आणि दुय्यम निरीक्षक श्री. रोटे, नयना देशमुख यांनी चिखली, देऊळगावराजा येथे अवैध मद्यविक्रीचे 6 वारस गुन्हे नोंदवून 64.08 लिटर देशी आणि 5.40 लिटर विदेशी असा 30 हजार 270 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

अवैध मद्य विक्री अथवा बनावट मद्यनिर्मिती आढळल्यास टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९९ किंवा व्हॉटसअॅप क्रमांक ८४२२००११३३ वर किंवा excisesuvidha.mahaonline.gov.in पोर्टलवर तात्काळ कळवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Previous articleतब्बल 683 शेतकऱ्यांच्या डोळ्यात ‘पाऊस !’ – शेत गेलं, माती गेली, मातीसह पीकही गेलं! -चार दिवसात 47 गावांना अतिवृष्टीचा तडाखा !
Next articleनांदेडकरांचा देव माणूस काळाच्या पडद्याआड
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.