Home बुलढाणा तब्बल 683 शेतकऱ्यांच्या डोळ्यात ‘पाऊस !’ – शेत गेलं, माती गेली, मातीसह...

तब्बल 683 शेतकऱ्यांच्या डोळ्यात ‘पाऊस !’ – शेत गेलं, माती गेली, मातीसह पीकही गेलं! -चार दिवसात 47 गावांना अतिवृष्टीचा तडाखा !

67

आशाताई बच्छाव

1000685155.jpg

तब्बल 683 शेतकऱ्यांच्या डोळ्यात ‘पाऊस !’ – शेत गेलं, माती गेली, मातीसह पीकही गेलं! -चार दिवसात 47 गावांना अतिवृष्टीचा तडाखा !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर

बुलढाणा :- बुलढाणा आभाळात जसा अजूनही पाऊस दाटलेला आहे तसा जिल्ह्यातील
जिल्ह्याताल 683 शेतकऱ्यांच्या डोळ्यात देखील ‘पाऊस’ दाटलाय ! गेल्या चार दिवसात पाऊस असा बरसला की, जिल्ह्यातील 47 गावांना पीक नुकसानीचा तडाखा बसून 495 हेक्टरवरील शेतीवर पाणी फेरल्या गेले.

21 ते 24 ऑगस्ट दरम्यान जिल्ह्यात पाऊस बरसला. पावसामुळे 47 गावांतील 683 शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला. यामध्ये 341 हेक्टर क्षेत्रावरील पीक बाधित झाले तर 154 हेक्टर शेतजमीन खरडून गेली आहे. तब्बल 495 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले. जिल्ह्यातील सर्वाधिक नुकसान जळगाव जामोद तालुक्यातील 19 गावामध्ये झाले. त्या पाठोपाठ मोताळा तालुक्यातील 10

गावांमध्ये शेती उध्वस्त झाली असून 290 शेतकरी नुकसानग्रस्त झालेत. मेहकर तालुक्यातील 200 शेतकऱ्यांवर नुकसानीचे संकट ओढावले. बुलढाणा, मलकापूर, खामगाव आणि नांदुरा येथेही शेती पिकांची नासाडी झाली. पाऊस तसा तारक आहे पण कधी कधी तो मारक ठरतो. गेल्या चार दिवसात पाऊस झाल्याने नद्यांना पूर आला. धरणे ओव्हर फ्लो झाले. पुराचे पाणी शेतात घुसले. त्यात पिके आणि शेतातील जमीन अक्षरशः खरडून गेली. पावसामुळे सोयाबीन, कापूस मुगासह ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर पिकं तर गेलीच गेली पण त्याबरोबर जमीन देखील खरडूनगेल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

Previous articleमेरा खुर्द येथे वरली मटक्याचा खुलेआम खेळ सुरू ….
Next articleविविध ठिकाणी राज्य उत्पादन विभागातर्फे कारवाई मोहिमेत 27 गुन्ह्यासह 4 लाखांचा माल जप्त….
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.