Home बुलढाणा छटाक्यां’चा विषय लय हार्ड हे.. ‘भाईगिरी’चे त्यांच्याकडं कार्ड हे!

छटाक्यां’चा विषय लय हार्ड हे.. ‘भाईगिरी’चे त्यांच्याकडं कार्ड हे!

24
0

आशाताई बच्छाव

1000685136.jpg

‘छटाक्यां’चा विषय लय हार्ड हे.. ‘भाईगिरी’चे त्यांच्याकडं कार्ड हे!
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- मलकापूर तालुक्यातील अलीकडे लहान मोठ्या विद्यार्थ्यांमध्ये भाईगिरीची क्रेझ दिसते. छोट्याशा कारणावरून मारहाणीच्या घटना
घडताहेत. बस मध्ये चढताना पुढे सरकला नसल्याचा राग आल्याने एका विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोक्यात फायटर मारले. हे प्रकरण आधी शाळेत गेले व नंतर पोलीस ठाण्यात गेल्याने आठ जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मलकापूर तालुक्यातील दाताळा बसस्थानकावर हा प्रकार घडला.

पिंपळखुटा बुद्रुक येथील किरण रामेश्वर मालठाने यांच्या भावाचा 16 वर्षीय मुलगा अविनाश चंद्रशेखर मालठाणे हा दाताळा येथील शाळेमध्ये शिक्षण घेत आहे. तो दररोज दाताळा ते पिंपळखुटा बुद्रुक एसटी बसणे ये-जा करतो. 24 ऑगस्टला सकाळी साडेअकरा वाजता मलकापूर ते निमखेड एसटी बस दाताळा बस स्टॉप वर आली. यावेळी शाळेतील मुले
बस मध्ये चढले. दरम्यान अविनाश देखील बसमध्ये चढला होता. बस मध्ये गर्दी असल्याने त्याच्या पाठीमागून चढणाऱ्या भाडगणी येथील 17 वर्षीय युवराज शेले, 15 वर्षीय भावेश राजपूत, दीपक राजपूत, आदी मुले आधी चढलेल्या मुलांना पुढे सरकायचे म्हणाले. जागा नसल्यामुळे ते पुढे सरकले नाहीत याचा राग मनात धरून अविनाश मालठाणेला त्यांनी बसमधून खाली उतरविले व हातातील फायटरने डोक्यावर मारहाण केली. दरम्यान या घटनेबाबत शाळेतील शिक्षकांनी मारहाण करणाऱ्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना शाळेमध्ये बोलावून समज दिली होती. परंतु पुन्हा दाताळा बस स्थानकावरदीपक सिंग राजपूत रा. भाडगणी याने
त्याचे नातेवाईक व मित्रांना फोन करूनदाताळा बस स्थानकावर बोलाविले आणि नैनेश विजयसिंह राजपूत रा. दाताळा यांनी त्याच्या हातातील कड्याने अविनाशच्या डोक्यावर मारून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. अशी तक्रार पोलिसांना दिल्याने पोलिसांनी युवराज शेले, भावेश राजपूत, दीपक सिंग राजपूत, विशाल राठोड तसेच भावेशचे वडील यांच्यासह नैनेश राजपूत, पंकजसिंग राजपूत, दिनेश राजपूत रा. भाडगणी, दाताळा, वरखेड अशा 8 जणांविरुद्ध कलम 118(1), 115(2), 351(2), 351(3), 189(2),191(2), 190 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले.

Previous articleपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झालेला समुद्रकिनाऱ्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला.
Next articleमेरा खुर्द येथे वरली मटक्याचा खुलेआम खेळ सुरू ….
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here