Home जालना जालना जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पाऊस झाल्याने विहीरींच्या पाणीपातळीत वाढ

जालना जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पाऊस झाल्याने विहीरींच्या पाणीपातळीत वाढ

17
0

आशाताई बच्छाव

1000677535.jpg

जालना जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पाऊस झाल्याने विहीरींच्या पाणीपातळीत वाढ
जालना -वसंतराव देशमुख
दिनांक २६/०८/२०२४
याविषयी सविस्तर माहिती अशी की,
जालना जिल्ह्यात सर्वदूर चांगला पाऊस होत असून त्यामुळे पाणी पातळी वाढत असून भविष्यातील पिण्याचा पाणी प्रश्न सुटेल असे शेतकरी व्यक्त करत आहेत.या पावसामुळे परिसरातील विहीरींच्या पाणीपातळीतही वाढ झाली आहे. आतापर्यंत शेतीच्या माला साठी उपयुक्त पाऊस झाला होता मात्र नदी नाले कोरडे, तर विहिरी ही अजून

कोरड्याच होत्या. मात्र मागील काही दिवसात चांगला पाऊस झाला असून दिनांक २४ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजेपासून संध्याकाळ पर्यंत झालेल्या पावसांने छोटे-मोठे ओढे, नाले चांगल्या प्रकारे वाहू लागल्याने बळीराजा सुखावला आहे. विहीरींना चांगल्या प्रकारे पाणी येण्यास
सरूवात झाली असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. या पावासाने रब्बी पिकांना मोठा फायदा होणार होणार असल्याचे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सांगितले. हा पाऊस या मोसमातील सगळ्यात चांगला पाऊस झाल्याने शेतकरी बांधव बोलत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here