Home गडचिरोली बाबासाहेबांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या भूलथापांना बळी पडू नका

बाबासाहेबांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या भूलथापांना बळी पडू नका

34
0

आशाताई बच्छाव

1000655493.jpg

बाबासाहेबांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या भूलथापांना बळी पडू नका

कोठरी येथील बौद्ध समाजाच्या मेळाव्यात आमदार डॉक्टर देवरावजी होळी गरजले

मेळाव्याला भन्ते भगीरथ यांच्या सह बौद्ध समाजाचा प्रचंड प्रतिसाद

विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण

चामोर्शी/गडचिरोली (सुरज गुंडमवार ब्युरो चीफ)

महामानव, क्रांतीसुर्य, भारतरत्न, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जिवंतपणी वारंवार अपमान करून त्यांच्या नावाचा व बौद्ध समाजाच्या लोकांचा उपयोग केवळ मतासाठी करणाऱ्या काँग्रेस व महाविकास आघाडीच्या भुलथापांना बौद्ध समाजाने बळी पडू नये असे आवाहन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी कोठरी येथील बौद्ध समाजाच्या मेळाव्या प्रसंगी उपस्थिताना मार्गदर्शन करताना केले.

यावेळी सरपंच निताताई पुडो, उपसरपंच छत्रपती दुर्गे, धर्मप्रकाश कुकुडकर, चंद्रगुप्त कोटांगले, संगीता साखरे, गौतम मेश्राम, विलास दहिवले, गौतम खोब्रागडे, निमसरकार, अनिल भैसारे, उत्तम मेश्राम, नाजूक वाळके, वेनुदास तुरे तसेच बौद्ध समाज बांधव मोठ्या संख्येने प्रामुख्यानं उपस्थित होते.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना लोकसभेत निवडून येता येऊ नये यासाठी २ वेळा त्यांच्या विरोधात उमेदवार उभे करून त्यांना पाडण्याचे महापाप या काँग्रेस सरकारने केले आहे. संविधानाला आत्तापर्यंत 85 वेळा घटनादुरुस्तीच्या नावावर बदलविण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. ४२ व्या घटना दुरुस्तीच्या निमित्ताने देशात आणीबाणी लावून त्यांनी संविधान संपवण्याचे महापाप केले आहे . अखेर मोरारजी देसाई व अटलजींच्या नेतृत्वातील सरकारने ती घटना दुरुस्ती रद्द केली व संविधानाचे रक्षण केले. याउलट भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातील सरकारने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा गौरव व सन्मान करण्याचा नेहमीच प्रयत्न केलेला आहे. बाबासाहेबांचे लंडन येथील घर विकत घेऊन त्या ठिकाणी स्मारक उभारण्याचा निर्णय केला मुंबईतील इंदू मिलची जागा समाजासाठी आरक्षित ठेवून बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारले. बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मगाव “महू” येथे भव्य स्मारक उभारून बाबासाहेबांना आदरांजली वाहिली आहे.

जिवंतपणी स्वतःला भारतरत्न घोषित करणाऱ्या पंडित नेहरूंना महामानव बाबासाहेबांना कधी “भारतरत्न” देता आले नाही. भाजपा व व्ही पी सिंग सरकारच्या काळात १९९० मध्ये क्रांतीसुर्य बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न देऊन गौरवण्याचे काम आपल्या सरकारने केले आहे. भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातील सरकारने संविधान बदलविण्याचा कधीही प्रयत्न केला नाही मात्र तशा तशा खोट्या बातम्या पसरवून काँग्रेसने केवळ भाजपाला बदनाम करण्याचे काम केले त्यामुळे बौद्ध समाजाने या सर्व बाबींचा सकारात्मकपणे विचार करणे गरजेचे आहे. आपण आता काँग्रेस व महाविकास आघाडीच्या अपप्रचाराला बळी न पडता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये बाबासाहेबांचा नेहमीच सन्मान करणाऱ्या भाजपाला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Previous articleप्रो गोविंदा’च्या माध्यमातून गोविंदा खेळ जगभरात पोहचल्याचा आनंद – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Next articleओबीसींच्या कल्याणासाठी सदैव कटिबद्ध ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिला विश्वास
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here