आशाताई बच्छाव
नंदुरबार वनविभागाच्या कारवाईस यश, नंदूरबार,(हेमंत जगताप ब्युरो चीफ)- मागील गेल्या एक ते दोन महिन्यापासून नंदुरबार शहरातील साक्रीनाका परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला होता, अखेर एक ऑगस्ट रोजी बिबट्यास जेरबंद करण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यात तीन दिवसानंतर धुमाकूळ घालणारा बिबट्या, अखेर जेरबंद करण्यास नंदुरबार वन विभागाला यश मिळाले आहे, व परिसरातील नागरिकांनी सुटकेचा विश्वास टाकला आहे. नंदुरबार शहरात मागील काही महिन्यापासून बिबट्या धुमाकूळ घालत असल्याचे परिसरातील नागरिकांमधून तक्रार प्राप्त झाली होती, त्यानुसार नंदुरबार वनपरिक्षेत्र अधिकारी वर्षा चव्हाण यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसा,र नंदुरबार शहरातील इमाम बादशाह दर्गा परिसरात असलेल्या पीर तलाव, हिरा इंग्लिश मीडियम स्कूल, व तलाव पाडा परिसरात बिबट्या जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावण्यात आले होते, त्याअनुषंगाने दिनांक 1 ऑगस्ट रोजी पिंजरे लावल्यानंतर तब्बल तीन दिवसांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर, आज चार ऑगस्ट रोजी सायंकाळी सात ते साडेसात वाजेच्या सुमारास, नंदुरबार शहरालगत असलेल्या साक्री नाका परिसरातील इमामबादशा दर्गा नजीक असलेल्या, हिरा इंग्लिश मीडियम स्कूल जवळ लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात धुमाकूळ घालणारा व परिसरातील नागरिकांत दहशत पसरविणारा एक बिबट्या अखेर जेरबंद झाल्याचे काही नागरिकांना व वन्यजीव प्राणी संरक्षण आणि बहुउद्देशिय संस्था नंदुरबार च्या सदस्यांना आढळून आले, त्यानुसार नंदुरबार वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार त्या ठिकाणी बिबट्यास जेरबंद करून नंदुरबार वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या आवारात सुरक्षितपणे आणण्यात आले आहे, सदरचा बिबट्या हा नर जातीचा असून, साधारण त्याचे वय तीन ते चार वर्ष असल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तपासणीतून निष्पन्न झाले आहे, सदरची कारवाई नंदुरबार सहाय्यक वनसंरक्षक कृष्णा भंवर यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक उपवनसंरक्षक संजय साळुंखे, तसेच सहाय्यक उपवनसंरक्षक धनंजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, नंदुरबार वनपरिक्षेत्र अधिकारी वर्षा चव्हाण, वनपाल बिलाल शहा, तसेच वन्यप्राणी संरक्षण आणि बहुउद्देशीय संस्थेचे सदस्य यांनी बिबट्या जेर बंद करण्यास परिश्रम घेतले, यावेळी वन्यजीव प्राणी संरक्षण आणि बहुउद्देशीय संस्था नंदुरबारचे संस्थापक अध्यक्ष संजय वानखेडे, राहुल कैलास खैरनार कैलास देसाई, चेतन आखाडे, चेतन पाटील, आशिष ठाकूर, चेतन अहिरे, रोहित पिंपळे, गणेश बागले,सनी शिरसाठ गणेश सोनवणे आदींनी मिळून ही कार्यवाही केली.