आशाताई बच्छाव
रस्त्यात खड्डे का खड्ड्यात रस्ते शेंदुर्जन खळेगाव रस्ता देत आहे मरणाला आमंत्रण….
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
सिंदखेडराजा :- बुलढाणा तालुक्यातील शेंदुर्जन जागदरी खळेगाव या 9 किलोमीटर रोडचे अतोनात हाल झाले असून हा रस्ता वाहनधारकांच्या जीवावर उठला आहे हा रस्ता जागोजागी वाहून गेला तरी लोकप्रतिनिधी व संबंधित विभागाला लोकांच्या मृत्यू झाला काय व लोकांचे मणके तुटले असले तरी काही सुतुक दिसून येत नाही, जागदरी हे गाव शेंदुर्जन ला शुक्रवारला बाजारासाठी लोक जा-ये करतात परंतु या रस्त्याच्या अवस्थेमुळे यांना आपला जीव मुठीत धरून जागदरी येथून जावे लागते. शिक्षण, दवाखाना खरेदीसाठी इतरही महत्वाच्या कामासाठी शेंदुर्जन साखरखेर्डा सिनखेडराजा जाण्यासाठी हाच रस्ता असल्यामुळे वाहनधारकांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे,
रस्ता पूर्णपणे उखडला असून जागदरी रस्त्यावर काही ठिकाणी मोठाले खड्डे पडून अनेक ठिकाणी रस्त्याची दूर अवस्था झाली आहे लोकप्रतिनि या रस्त्याबाबत आवाज उठवला असता तर संबंधित ठेकेदार यांनी कामाला सुरुवात केली असती, शेदुर्जन ते खलेगाव जाणाऱ्या रस्त्यावर मोठे भक्ताड पडलेले असून अनेक महिन्यांपासून त्यांच्याकडे सुद्धा संबंधित विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होतांना दिसून येत आहे. जागदरी शेंदुर्जन हा रस्ता नेहमी वाहनाने गजबजलेला असतो, हा रोड वरून वाहण्याचे रहदारी ही जास्त असल्यामुळे दिवसातून अनेक वेळा या रस्त्यावर लहान मोठे अपघात होत असल्याने हा रस्ता वाहनधारकाच्या जीवावर उठलां जिवंतपणे वाहनधारकांना मरण येताना रस्त्यावरून जात असतानाचे दिसून येत आहे जागदरी, शेंदुर्जन,भंडारी,कंडारी आणि खालेगाव या चार गावातील सर्व वाहनधारकांच्या जीवावर उठलेला असून संबंधित विभाग व लोकप्रतिनिधींनी वेळेस लक्ष न घातल्यास जागदरी सह परिसरातील नागरिकांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्व लोकप्रतिनिधींना धडा शिकवावा लागेल,अशी प्रवास करणाऱ्या लोकांमध्ये चर्चा सुरू आहे.