आशाताई बच्छाव
पश्चिम विदर्भातील धरणामध्ये केवळ ३८ टक्के जलसाठा. हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी दमदार पावसाची प्रतीक्षा.
दैनिक युवा मराठा
पी.एन.देशमुख
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती
पावसाळा सुरू होऊन जवळपास दीड महिन्याचा कालावधी उलटून गेला तरी देखील अमरावती विभागातील लहान-मोठी धरणे व तलावाची अवस्था अद्यापही बिकट आहे. मोठ्या प्रकल्पामध्ये केवळ ३८.६१ टक्के, जलसाठा झाला आहे. मध्यम प्रकल्प व सिंचन तलावामध्ये समाधानकारक जनसाठा झालेला नाही. यंदाच्या पावसाळ्यात सिंचन प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरणार काय. यासाठी शेतकऱ्यांच्या नजरा वरून राजाकडे लागले आहे. विभागातील ९ मोठ्या प्रकल्पामध्ये ५४०.५० दशलक्ष घनमीटर म्हणजे ३८.६१ जलसाठा झाला असून एकूण २७ मध्यम प्रकल्पामध्ये ३४९.८२ दल घमी (४५.३३) टक्के, तर २५३ लघु प्रकल्पामध्ये २२२ डलघमी (२३.९४) टक्के जलसाठा आहे. हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी विभागातील नागरिकांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. सर्व लहान मोठ्या प्रकल्पामध्ये जलसाठा केवळ ३५.८८ टक्के एवढा आहे. गतवर्षी १५ जुलै अखेर मोठ्या प्रकल्पामध्ये ६११ दलघमी व म्हणजे ४३.६९ टक्के जलसाठा झाला होता तर मध्यम प्रकल्पामध्ये ३२२ दलघमी म्हणजे ४१.७८ टक्के पाण्याची साठवणूक झाली होती. सर्वच प्रकल्पामध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत आतापर्यंत ५ते१० टक्के जलसाठा कमी आहे. विभागातील प्रकल्पातील सध्या स्थिती अमरावती विभागातील अप्पर वर्धा प्रकल्पात सध्या २६६ दलघमी (४७) टक्के, पुस ५३ दलघमी, (५८) टक्के, अरुणावती ६१ दलघमी (३६) टक्के, बेंबळा दलघमी ८३(४५) टक्के, वान२१ दलघमी (२५) टक्के, नळगंगा २२ दलघमी (३१) टक्के, पेन टाकळी ७ दलघमी(१३) टक्के तर खडकपूर्णा प्रकल्पात शून्य टक्के पाणीसाठा आहे.