आशाताई बच्छाव
राज्य राखीव पोलीस बलाच्या शारीरिक व मैदानी चाचणीचा शेवट मंगळवारी
जालना, दि. 19 (दिलीप बोंडे ब्युरो चीफ) :- राज्य राखीव पोलीस बल गट क्र.3 जालना येथील 248 रिक्त पदाकरीता 25 हजार 463 उमेदवारांचे आवेदन अर्ज प्राप्त झाले आहेत. सदरची सशस्त्र पोलीस शिपाई भरती प्रक्रिया दि. 19 जुन 2024 रोजी पासुन गट क्र. 3 जालना येथे सुरु आहे. राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 3 जालना येथील शारीरिक व मैदानी चाचणीची मंगळवार दि. 23 जुलै 2024 रोजी शेवटची तारीख असून त्यानंतर शारीरिक व मैदानी चाचणी घेण्यात येणार नाही.
MAHA-IT यांचेद्वारे प्रशासकीय तथा पावसाळी हवामानामुळे बऱ्याच उमेदवारंना शारीरिक व मैदानी चाचणी करीता हजर राहण्याच्या नव्याने तारखा देण्यात आलेल्या आहेत अश्या उमेदवारांनी त्याच दिनांकास चाचणीकरीता हजर रहावयायचे आहे. दि. 23 जुलै 2024 रोजी नंतर मैदानी चाचणीस उपस्थित राहणाऱ्या उमेदवार यांना भरती प्रक्रियेत सामावून घेण्यात येणार नाही. शारीरिक व मैदानी चाचणी संपल्यानंतर सदर अंतिम दिनांकानंतर लेखी परिक्षेबाबत पुर्व तयारी चालु करण्यात येणार आहे. मैदानी चाचणीचे शेवटचा एक दिवस दि.23 जुलै 2024 मंगळवार रोजी असून जे उमेदवार प्रासांगिक कारणामुळे मैदानी चाचणीस उपस्थित राहू शकले नाहीत त्यांना दि. 23 जुलै 2024 रोजी उपस्थित राहून आपली शारीरिक व मैदानी चाचणी पुर्ण करुन घेण्याची मुभा/संधी देण्यात येत आहे. सदर उमेदवार यांनी येतांना अर्ज,प्रवेशपत्र व विलंबाबत असलेल्या कारणाचा सबळ पुरावा घेऊन उपस्थित राहावे. संपर्क क्रमांक – 02482-230902
अधिक माहितीसाठी – www.maharashtrasrpf.gov.in, www.mahapolice.gov.in policerecruitment2024.mahait.org या संकेत स्थळाला भेट देण्यात यावी.असे आवाहन राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 3 चे समादेशक यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.