Home युवा मराठा विशेष महाएकादशी – आषाढी एकादशी

महाएकादशी – आषाढी एकादशी

40
0

आशाताई बच्छाव

1000552222.jpg

महाएकादशी – आषाढी एकादशी
जिल्हा प्रतिनिधी जालना -वसंतराव देशमुख
दिनांक १६/०७/२०२४

आषाढी एकादशी म्हणजे आषाढ महिन्यात येणारी एकादशी. आषाढ महिन्यामध्ये अशा दोन एकादशी येतात. एक शुद्ध आणि दुसरी वद्य. दोन एकादशी जरी येत असल्या तरी शुद्ध पक्षावर येणाऱ्या आषाढी एकादशीला विशेष असे महत्त्व आहे. या एकादशीला मोठ्या संख्येने वारकरी भाविक मंडळी जगाचा मायबाप असलेल्या पांडुरंगाच्या भेटीसाठी पंढरपूरची यात्रा करतात. या यात्रेस वारी म्हटले जाते. महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यातून मोठ्या संख्येने पांडुरंगाचे भक्त या एकादशीनिमित्त पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूर येथे येत असतात. जसे भक्त येतात तशा विविध पालख्याहि येतात. हि प्रथा येथे खूप जुन्या काळापासून चालत आलेली आहे. यामध्ये प्रामुख्याने पैठण वरून शांती ब्रम्ह संत एकनाथ महाराजांची पालखी, देहू वरून जगद्गुरु तुकाराम महाराजांची पालखी, त्र्यंबकेश्वर येथुन निवृत्तीनाथांची पालखी, आळंदीवरून संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी, शेगाव वरून श्री संत गजानन महाराजांची पालखी, खान्देशातुन मुक्ताई नगर येथुन संत मुक्ताबाई यांची पालखी यासह उत्तर भारतातून संत कबीराची पालखी. अशा विविध पालख्या राज्य आणि देशाच्या विविध भागातून आषाढी एकादशीच्या निमित्ताने पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला येत असतात. या आषाढी एकादशीनिमित्त वारकरी संप्रदायामध्ये स्वतः व घरातील लहान-मोठे ज्येष्ठ मंडळी उपवास करतात. याची एक महत्वपूर्ण कथा आहे.असे म्हणतात “प्राचीन काळामध्ये मृत्यूमान्य नावाचा दैत्य होता. ज्याने भगवान शंकराची आराधना करून शंकराकडून अमरत्व मिळावे असा वर प्राप्त केला. शंकराने त्याला तो वर दिला. परंतु त्यासोबतच त्याला सांगितले या वराने तू अमर राहशील. पण जर तुझा मृत्यू झाला तर, एका स्त्रीच्या हस्ते होईल. असा वर मिळाल्यानंतर मृत्यूमान्य यांने सर्वत्र हाहाकार माजवला. ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्याकडूनही त्यांना भीती राहिली नव्हती. तसेच सर्व देव -देवता यांच्यापासूनच त्याला काही भीती राहिली नाही, त्यामुळे सामान्य लोक साधू संत यांना त्रास देत सुटला. त्याच्या या सर्व त्रासासमोर सर्व हतबल झाले होते. सर्व देवही भयभित होऊन शंकराकडे गेले परंतु शंकरही यावर मार्ग काढण्यासाठी हतबल झाले होते. अशाच परिस्थितीमध्ये भयभीत झालेले सर्व देव एका गुहेत तळाशी जाऊन बसले. तिथे त्यांना दिवसभराचा उपवास घडला आणि चालू असणाऱ्या प्रजन्यांमध्ये त्यांचे प्रजन्य स्नान झाले. या सर्व एकवटलेल्या देवांच्या श्वासातून एक देवी उत्पन्न झाली. त्या देवीने मृदूमान्य नावाच्या राक्षसाचा वध केला. ही देवी म्हणजे एकादशी म्हणून या देवीला सर्व देवता महाशक्तिशाली म्हणून मानतात. तसेच या एकादशीची उपासना शैव आणि वैष्णव असे सर्वच उपासक उपासनेचे व्रत ठेवून करतात. अशी ही कथा ” यासारख्या अनेक कथा प्रचलित आहेत. विठ्ठलाला पुंडलिक भेटीसाठी आले असतांना त्याकाळी द्वापार युगामध्ये गयासुर नावाच्या राक्षसाचा नाश जगत पित्याच्या आदेशाने अवतार घेऊन केला. या राक्षसास त्यांनी अग्नि कुंडामध्ये भस्म करून पुंडलिकाची भेट घेतली. आणि त्यांना मोक्ष मिळून दिला. यानंतर पुढे इसवी सन १३ ते १७ या काळामध्ये संत नामदेव, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, इतर मोठा भक्त परिवार विठ्ठलाच्या वारीसाठी पंढरपूरला येत असे. पुढे संत मीराबाई, संत गोरा कुंभार, संत सावता महाराज अशी मोठी संत मंडळी विठ्ठलाच्या चरणी भक्त होऊन संत झाली. अशी सर्व जाती धर्म यांना सोबत घेऊन चालणाऱ्या संताची जोड जमली. यांनी मोठमोठे अभंग विठ्ठला चरणी रचले. आणि नियमितपणे एकादशीची वारी आषाढी जन माणसापर्यंत पोहचली. एकादशी ही आषाढ महिन्यातील शुद्ध अकरावी तिथीला येते.या एकादशीला महाएकादशी,देवयानी एकादशी असेही म्हणतात. अत्यंत पवित्र असलेल्या या दिवसापासून चातुर्मासाची सुरुवात होते. असे मानले जाते. आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू निद्रिस्त होतात. आणि कार्तिक एकादशीला जागृत होतात. या काळामध्ये लोक अनेक लोक मांसाहार वर्ज करतात. अशा आषाढी एकादशीच्या बऱ्याच गोष्टी प्रसिद्ध आहे. पंढरपूरला असलेले पुरातन मंदिर तत्कालीन राजा शालीवानाच्या काळातील असल्याचे मानले जाते. मूर्ती आणि मंदिर अगदी पुरातन असून त्याचा इ.स.व ८३ मध्ये प्रथम जीर्णोद्धार केल्याचे पुरावे आपल्याला सापडतात, ५१६ मध्ये परत एकदा जिर्णोद्धार झाल्याचे पुरावे आपल्याला इतिहासात बघायला मिळतात. १२९६ मध्ये पादुका प्रदक्षणाच्या प्रथेस सुरुवात झाली. त्यानंतर १६५० मध्ये बाबा हैबत यांची आळंदीवरून पंढरपूरच्या पालखीची प्रथा सुरू झाली. पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिराला पूर्वेकडे तीन दरवाजे, उत्तरेला तीन, दक्षिण आणि पश्चिमे कडे एकेक दरवाजा असून, मुख्य महाद्वार पूर्वेकडे आहेत. या दरवाजाला अकरा पायऱ्या असून एका पायरीला नामदेवाची पायरी म्हनून मानले जाते. अशा या आषाढीच्या महा एकादशीच्या निमित्ताने व्रत केल्याने विविध पुण्य फळ प्राप्त होते.
संकलन-वसंतराव देशमुख जालना 

Previous articleपंढरपूर विठ्ठल दर्शन पायी वारी मधील सांगितलेले अनुभव -विठ्ठल भक्त रामदास बदर
Next articleराजमाता जिजाऊ स्कूल माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय टेंभुर्णी येथे आषाढी एकादशी उत्साहात साजरी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here