Home बुलढाणा पोटच्या मुलीचे केले होते शोषण नराधम बापास बुलढाणा न्यायालयाने दिली मरेपर्यंत जन्मठेपेची...

पोटच्या मुलीचे केले होते शोषण नराधम बापास बुलढाणा न्यायालयाने दिली मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा….

76

आशाताई बच्छाव

1000522247.jpg

पोटच्या मुलीचे केले होते शोषण नराधम बापास बुलढाणा न्यायालयाने दिली मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा….
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा बिरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :-चिखली तालुक्यातील पोटच्या मुलीचे शारीरिक शोषण करून तिला गर्भवती करणाऱ्या बापास जिल्हा व सत्र न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेप व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे सविस्तर वृत्त असे की, चिखली तालुक्यातील पोटच्या अल्पयीन मुलीचे शारिरीक शोषण करून तिला गर्भवती करणाऱ्या नराधम बापास जिल्हा व सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश आर. एन. मेहरे यांनी मरेपर्यंत जन्मठेप व तीन हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.बापलेकीच्या पवित्र नात्याला कलंक लावणारी ही घटना डिसेंबर २०२२ मध्ये घडली होती. शेख शकील नावाच्या नराधमाने बायको माहेरी गेल्यावर स्वतःच्या पोटच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. त्यातून ती प्रेग्नेंट राहिली. मुलीचे पोट दुखूत असल्यामुळे त्या मुलीला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले त्यावेळेस ही बाब डॉक्टरांच्या लक्षात आले लगेच डॉक्टरांनी मुलगी अल्पवयीन असल्यामुळे पोलिसांना कळवले.
विशेष म्हणजे त्यावेळी पोटच्या मुलीवर अत्याचार झाला असताना देखील मुलीच्या आईने स्वतःच्या नवऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न केला होता. मार्च २०२३ मध्ये चिखली तालुक्यातील पिडीत अल्पवयीन १६ वर्षीय मुलगी पोट दुखत असल्याने आपल्या आईसह चिखली येथील दवाखान्यात गेली होती. डॉक्टरांनी मुलीला तपासले, तर तिला चार महिन्याची गर्भधारणा असल्याची धक्कादायक बाब समोर आली. ही घटना अतिशय गंभीर असल्याचे दिसून येतात, डॉक्टरांनी एमएलसीद्वारे चिखली पोलिसांना ही माहिती दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण तळी यांनी चिखली पोलिसांत अज्ञात आरोपी विरोधात बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा नोंदविला. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सविता मोरे पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला.प्रकरण अतिशय गंभीर स्वरूपाचे असल्याचे लक्षात येताच. पोलिसांनी तातडीने कारवाई सुरू केली. पीडितेचा नराधम बाप शकीलला अटक करण्यात आली. बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी म्हणून तो निष्पन्न झाला.सदर गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम यांनी स्वतःकडे घेतला. आरोपी शकील विरोधात पुरावा मिळून आल्याने बुलढाणा येथील विशेष न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले. हे प्रकरण सरकार तर्फे चालविण्यासाठी विशेष सरकारी वकील ॲड. संतोष खत्री यांना सोपविण्यात आले. प्रकरणामध्ये सरकारी पक्षातर्फे एकूण १४ साक्षीदार तपासल्या गेलेत. पिडीता, तिचा गर्भ व आरोपीचे डीएनए नमुने असा रासायनिक विश्लेषण अहवाल सुद्धा प्राप्त झाला. त्यामध्ये पिडीता व आरोपी दोघांचीही नाते बाप लेक असल्याचे वैद्यकीय रित्या निष्पन्न झाले. आरोपीने वैद्यकीय तपासणी दरम्यान, डॉक्टरांना सांगितलेल्या घटनेचा तसेच इतर पुराव्यांना ग्राह्य धरत विशेष न्यायाधीश आर. एन. मेहरे यांनी आरोपी बापास जन्मठेपेची शिक्षा व तीन हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

Previous articleगौर से देखो इन ‘खाकीधारियोंको!’ – कर्तव्यावर दारू पिऊन जाणे योग्य आहे काय?
Next articleसुकर अर्ज प्रक्रिया – जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील , शांततेत अर्ज प्रक्रिया करण्याचे आवाहन….
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.