Home जालना आजचा शेतकरी कर्जबाजारी का झाला आहे ?

आजचा शेतकरी कर्जबाजारी का झाला आहे ?

74
0

आशाताई बच्छाव

1000495437.jpg

आजचा शेतकरी कर्जबाजारी का झाला आहे ?
तालुका प्रतिनिधी जाफराबाद -मुरलीधर डहाके
दिनांक 25 /0 6/ 2024
सविस्तर वृत्त असे की, आजच्या युगातील शेतकरी कर्जबाजारी का झाला आहे ? याचं कारण गेल्या ४०/५० वर्षां अगोदर शेतकरी घरातील पारंपरिक बी बियाणे पेरणीसाठी वापरत होते. त्यामध्ये रासायनिक खताचा वापर नव्हता सेंद्रिय खत शेणखत याचा उपयोग जास्त प्रमाणात केला जात होता .आणि रासायनिक खते व संकरित बियाणे हे विकत घेण्याची गरज नव्हती . शेतातील तयार करण्यात आलेल्या पिकामधुनच चांगल्या प्रतीचे बियाणे पुढच्या वर्षीच्या पेरणीसाठी एकदम व्यवस्थितपणे ठेवत होते .त्यानंतर काही कालांतराने मोठमोठ्या कंपन्या मार्केटमध्ये आल्या आणि त्यांनी शेतकऱ्यांना हळूहळू संकरित बियाणे व रासायनिक खतांची सवय लावून दिली की, आमच्याकडून बी- बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके घ्या आणि या त्यांच्या षडयंत्राला शेतकरी राजा बळी पडला. त्यानंतर कंपनीने शेतकऱ्यांना टार्गेट करण्यास सुरुवात केली. हायब्रीड बियाणे शेतकऱ्यांना कृषी सेवाच्या केंद्राच्या माध्यमातून घेण्यास भाग पाडले. रासायनिक औषधी रासायनिक खता -औषधाच्या चक्कर मध्ये शेतकरी हा पूर्णपणे कर्जबाजारी झाला आणि कर्जाच्या ओझाखाली दबला व कर्जात बुडाला.जेवढा माल झाला तेवढा बी, बियाणे, खते यामध्येच खर्च होऊन जातो खर्चाच्या प्रमाणात शेतीमालाला भाव मिळत नाही म्हणून शेतकरी राजा या कंपन्यांच्या कृषी सेवाच्या नादामध्ये कर्जबाजारी झाला.अनेक राजकारण्यांनी शेतकऱ्यांना पाठिंबा तर दिलाच नाही परंतु त्यांना जीएसटी यांच्या माध्यमातून टॅक्स वगैरे लावून शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचे तळपट वाजवले. जर शेतकरी राजा हा पारंपारिक किंवा जुन्या पद्धतीने सेंद्रिय शेती करण्यात सुरुवात केली तर शेतकरी हा सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही हे मात्र तेवढेच खरे आहे.

Previous articleपालकमंत्री अतुल सावे आज 25 जून रोजी जालना दौऱ्यावर
Next articleखर्डे येथे मुसळधार पावसामुळे निवाने बारी घाटात दरड कोसळली
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here