आशाताई बच्छाव
‘ज्ञान आचरणात आणण्याची गरज’
सोनई, कारभारी गव्हाणे-. माऊलींनी सांगितल्याप्रमाणे ज्यांच्या मनात ‘विश्वची माझे घर’ ही भावना रुजली त्यांच्या हातून चांगले सत्कर्म होत आहेत. ग्रंथ वाचणे पुण्य असले, तरी त्यातील ओव्या लक्षात ठेवणे व अर्थ समजून घेण्यावर न थांबता प्राप्त ज्ञानाची अनुभूती आचरणात येणे आवश्यक आहे, असे विचार संत ज्ञानेश्वर पैसखांब संस्थानचे संतसेवक महंत देविदास महाराज म्हस्के यांनी व्यक्त केले.
सोनई येथील पसायदान-आनंदवन सेवाभावी संस्थेच्या वतीने दहा गरजू मुलींचे पाचवी ते दहावीपर्यंत शैक्षणिक पालकत्व कार्यक्रमात ते बोलत होते. संत ज्ञानेश्वर संस्थानचे विश्वस्त कैलास जाधव, संत निरंकारी परीवाराचे विठ्ठल महाराज खाडे, गणेश महाराज नवले, शिवाजी बाफणा, भैय्या कावरे, डॉ. संदीप तांबे, विठ्ठल सावंत उपस्थित होते. उपक्रमास योगदान दिलेले साई आदर्श मल्टीस्टेटचे अध्यक्ष शिवाजीराव
कपाळे, रेणुका येडुलकर-वाघ, विजय लोहकरे, शहाराम तांदळे, पुनम लकडे, अमर जायभाय, राहुल दरंदले, सुधीर वैरागर आदींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे उपाध्यक्ष विनायक दरंदले यांनी के चंद्रकांत राऊत यांचा विशेष सत् करण्यात आला. डॉ. तुषार दराडे य सुत्रसंचालन केले. अरुण घावटे आभार मानले.






