आशाताई बच्छाव
देवळा तालुक्यात विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
प्रतिनिधी-सतीश सावंत
देवळा तालुक्यातील चिंचवे येथील विवाहित महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली असुन देवळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सुनिता जयराम माळी (वय 35) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव असून आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. पोलिसांनी सांगितल्यानुसार सदर विवाहिता मंगळवार (दि.18) जून रोजी पाच वाजेच्या सुमारास हरविल्याची तक्रार दाखल झाली होती. तर (दि. 19) जून रोजी सकाळी चिंचवे येथील रमेश कस्तुरचंद काला यांच्या गट नंबर दोन अ मधील विहिरीवर या महिलेची चप्पल आढळून आल्याने सदर घटनेची माहिती देवळा पोलिसात कळवली असता सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील, पोलीस उपनिरीक्षक गुजर, पोलीस नाईक नितीन बारहाते, पोलीस हवालदार समाधान खुरसने, योगेश जामदार, महिला पोलीस माधुरी पवार, स्वाती चव्हाण घटनेस्थळी पोहोचले. सदर घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांनी तातडीने लोहनेर वरून दिलीप पैलवान या पट्टीच्या पोहणाऱ्याला बोलवून विहिरीत जवळपास तीन तास शोध मोहीम राबविली. मात्र त्या ठिकाणी काहीही आढळून आले नाही. मात्र गुरुवार (दि. 20) रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास सुनिता माळी यांचा मृतदेह विहिरीच्या पाण्यावरती तरंगताना आढळून आल्याने सदर घटना देवळा पोलिसांना कळवताच देवळा पोलीस नितीन बाराहाते योगेश जामदार घटनास्थळी पोहोचले व विहिरीतून मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला मृत सुनीता माळी यांना एक लहान मुलगा तीन मुली असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे सदर घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील करीत आहेत.