आशाताई बच्छाव
श्रीरामपूर ,(दिपक कदम तालुका प्रतिनिधी ) शालेय जीवनातील महत्त्वाचा टप्पा आणि विद्यार्थ्यांच्या भावी वाटचालीची दिशा ठरविणाऱ्या दहावी व बारावी परीक्षेतील श्रीरामपूर तालुक्यातील सुमारे 72 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ ‘फादर्स डे’ चे औचित्य साधुन उम्मती फाउंडेशन तर्फे नुकताच करण्यात आला. यावेळी त्यांना सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देण्यात आले तसेच त्यांना करीयर विषयी मार्गदर्शन देखील करण्यात आले.
उम्मती फाउंडेशनचे प्रमुख सोहेल बारूदवाला यांच्या माध्यमातून लोकमान्य टिळक वाचनालय, श्रीरामपूर येथे सदर कार्यक्रम पार पडला. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणुन मा. जिल्हा उपशिक्षणाधिकारी सुलोचनाताई पटारे मॅडम तर प्रमुख पाहुणे म्हणुन गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी मॅडम, शिवसेना जिल्हा प्रमुख अशोक थोरे मामा, डॉ. रविंद्र जगधने, पोलीस उपनिरीक्षक दिपक मेढे, समाधान सोळंके, स्थापत्य अभियंता बाळासाहेब कदम, वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्निल पुरनाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
मुफ्ती रिजवान चतुर्वेदी यांच्या प्रवचनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी बोलताना मुफ्ती म्हणाले, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अनेक यशोशिखरे गाठता येतात. जिद्द आणि कष्ट याला मार्गदर्शनाची साथ मिळाल्यास प्रत्येक विद्यार्थी यशस्वी होऊ शकतो. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ.तौफिक शेख यांनी उम्मती फाउंडेशनच्या आजमितीपर्यंतच्या विविध सामाजिक उपक्रमांचा आढावा घेतला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष पटारे मॅडम यांनी दहावी-बारावी नंतरच्या करीयरच्या विविध संधी सविस्तर सांगुन पालकांनादेखील विद्यार्थ्यांवर संस्कार करण्यास आवर्जुन सांगितले. प्रमुख पाहुण्या सामलेटी मॅडम म्हणाल्या की, सध्याच्या स्पर्धेच्या काळात स्पर्धेचे घोडे होण्याऐवजी आपण स्वत:शीच स्पर्धा करायला हवी. आमच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास झाला आहे का, याचेही आत्मपरीक्षण करायला हवे. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांबरोबरच कमी गुण मिळवलेल्या मुलांनाही मार्गदर्शनाची आवश्यकता असल्याचे सांगितले. पोलीस उपनिरीक्षक मेढे साहेब व सोळंके साहेब यांनी विद्यार्थ्यांना सोशल मीडीयाचा मर्यादीत वापर करण्याचा अनमोल सल्ला दिला. तसेच डॉ. रविंद्र जगधने व कदम सर यांनी देखील गुणवंत विद्यार्थ्यांचे तोंडभरून कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. आरीफ शेख यांनी तर आभार प्रदर्शन फिरोज पठाण सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शहानवाज गुलाम , असलम सय्यद, इरफान शेख, समीर शेख, ईसाक शेख, युसूफ लखाणी, शाकीफ शेख, अलीम बागवान, डॉ. सुदर्शन रानवडे, डॉ.अहतेशाम शेख, फारूक मेमन, आर. सोहेल, वसीम जहागिरदार, शाहरुख बागवान, माजिद मिर्जा आदींनी प्रयत्न केले. यावेळी पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.