आशाताई बच्छाव
नाशिक वार्ताहर मुकुंदा चित्ते
नाशिक लोकसभा मतदार संघात ठाकरे गटातून बंडखोरी करत विजय किसन करंजकर (अपक्ष) यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.
नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा अखेरचा दिवस असतांना ठाकरे गटात बंडखोरी झाली असून करंजकर हे आपली उमेदवारी कायम ठेवता की उमेदवारी अर्ज मागे घेता हे माघारीच्या शेवटच्या दिवशी स्पष्ट होणार आहे.
लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाकडून विजय करंजकर यांची उमेदवारी जवळपास निश्चित होती. पण, अचानक ठाकरे गटाने माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे करंजकर नाराज झाले. त्यांनी अद्यापपर्यंत ठाकरे गटाच्या उमेदवाराच्या प्रचारात सहभाग घेतला नाही. त्यांना मातोश्रीवरुनही बोलावणे आले होते. पण, ते पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या भेटीलाही गेले नाही. त्यामुळे त्यांची नाराजी अद्यापर्यंत दूर झालेली नाही.
करंजकर हे गेल्या लोकसभा निवडणुकीला सुध्दा इच्छुक होते. पण, त्यावेळेस हेमंत गोडसे यांना उमेदवारी दिली. यावेळेस गोडसे हे शिवसेना शिंदे गटात गेल्यामुळे करंजकर यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. त्यांनी मतदारांशी संपर्क सुध्दा सुरु केला होता. पण, त्यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी आता अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे