Home उतर महाराष्ट्र भोकर सबस्टेशन येथील जागृत देवस्थान हनुमाण मंदिर येथे मंदिर जिर्णोद्धार, मुर्तीप्राणप्रतिष्ठा व...

भोकर सबस्टेशन येथील जागृत देवस्थान हनुमाण मंदिर येथे मंदिर जिर्णोद्धार, मुर्तीप्राणप्रतिष्ठा व कलशरोहन सोहळा संपन्न

121

Yuva maratha news

1000317894.jpg

भोकर सबस्टेशन येथील जागृत देवस्थान हनुमाण मंदिर येथे
मंदिर जिर्णोद्धार, मुर्तीप्राणप्रतिष्ठा व कलशरोहन सोहळा संपन्न
  श्रीरामपूर/ भोकर (दिपक कदम तालुका प्रतिनिधी) – श्रीरामपूर तालुक्यातील भोकर शिवारातील भोकर सबस्टेशन येथील जागृत देवस्थान म्हणून ख्याती असलेल्या हनुमान मंदिराचा नुकताच जिर्णोद्धार करण्यात आला. त्यानिमीत्ताने येथील हनुमान मुर्ती प्राणप्रतिष्ठा व कलश रोहन सोहळा नुकताच नेवासा तालुक्यातील घोगरगाव येथील बहीरजात वेदमंदिर संस्थान येथील बालब्रम्हचारी महंत स्वामी विश्वनाथगीरीजी महाराज यांचे हस्ते संपन्न झाला.
भोकर परीसरातीलच नव्हेतर पंचक्रोषीत जागृत देवस्थान म्हणून ख्याती असलले हे हनुमानमंदिर राज्यमार्ग रूंदीकरणामुळे राज्यमार्गालगत आलेले होते. यानंतरच्या रूंदीकरणात येथे मंदिराला जागा अपुरी व रहदारीचे दृष्टीने धोकादायक झाल्याने येथील ग्रामस्थ व तरूणांनी पुढाकार घेत या मंदिराच्या मागे असलेल्या झिने यांच्या शेतात लोकसहभागातून गेल्या वर्षीपासून येथील मंदिर उभारणी सुरू होती. लोकवर्गणी व लोक सहभागातून सुमारे 20 लाख रूपये खर्चून येथे सुंदर व आकर्षक मंदिराची उभारणी करण्यात आली.
येथील मंदिर जिर्णाद्धारानंतर नाशिक येथील सचीन कुलकर्णी व विनायक जोशी आदि पुरोहितांकरवी यथासांग पुजापाठ करत येथील भागवताचार्य संतोष महाराज पटारे यांचे प्रमुख उपस्थीतीत येथील मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली तर नेवासा तालुक्यातील घोगरगाव येथील बहीरजात वेदमंदिर संस्थान येथील बालब्रम्हचारी महंत स्वामी विश्वनाथगीरीजी महाराज यांचेहस्ते कलश रोहन सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला.
याकामी येथील असंघटीत कामगार संघटेनेचे जिल्हा सचीव गणेश छल्लारे, भाजपाचे संचीत गिरमे, रविंद्र गिरमे, ज्ञानेश्वर झिने, सार्थक चौधरी, विलास चौधरी सतिष चौधरी, चंद्रकांत बेलदार, सुनिल मेहेत्रे, जितेंद्र चौधरी, भगवान पेरकर, अरूण मेहेत्रे, गोविंद आहेर, अनिकेत झिने आदिंसह परीसरातील तरूणांनी विशेष परीश्रम घेतले. योवळी येथील उद्योजक विलास अशोकराव चौधरी यांनी महाप्रसादाचे अन्नदान केले.या मंदिर उभारणीकामी तसेच मुर्तीप्राणप्रतिष्ठा व कलश रोहन या सर्व कार्याला परीसरातील, गावातील ग्रामस्थांसह अनेक भाविकांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याने कमी वेळेत आकर्षक मंदिर उभारणी करून सर्व सोहळा संपन्न करणे शक्य झाल्याचे येथील आयोजकांनी सांगीतले.
यावेळी ग्रामविकास अधिकारी राजेश तगरे, ग्रामपंचायत सदस्य आप्पासाहेब जाधव, भारत छल्लारे, संदिप शिंदे, राजेंद्र गिरमे, जितेंद्र छल्लारे, ठकसेन खंडागळे, गंगाराम गायकवाड, ज्ञानेश्वर कर्जुले, सिताराम खराडे, कैलास मेहेत्रे, सोमनाथ छल्लारे, सागर अमोलीक आदिंसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व भाविक उपस्थीत होते.

भोकर सबस्टेशन येथील हनुमाणमुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याप्रसंगी उपस्थीत असलेले बालब्रम्हचारी महंत स्वामी विश्वनाथगीरीजी महाराज, गणेश छल्लारे, संचीत गिरमे, रविंद्र गिरमे, ज्ञानेश्वर झिने, सार्थक चौधरी, विलास चौधरी सतिष चौधरी, चंद्रकांत बेलदार, सुनिल मेहेत्रे, जितेंद्र चौधरी, भगवान पेरकर, अरूण मेहेत्रे, गोविंद आहेर, अनिकेत झिने आदिंसह मान्यवर दिसत आहेत.

Previous articleमेळघाटातील मतदानाचा टक्का घसरला: अचलपूर मतदारसंघात ६१.३३/:तर बडनेरा ५०.९९/: मतदान.
Next articleवयाच्या 95 वर्षी आजीबाईने बजावला मतदानाचा अधिकार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.