Home नांदेड शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हाड ठिसूळता तपासणी शिबिर संपन्न

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हाड ठिसूळता तपासणी शिबिर संपन्न

64

आशाताई बच्छाव

IMG_20240316_165628.jpg

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हाड ठिसूळता तपासणी शिबिर संपन्न
मनोज बिरादार
मराठवाडा विभागीय संपादक
नांदेड,  :- जागतिक महिला दिनानिमित्त डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील अस्थिव्यंगोपचारशास्त्र व भौतिकोपचारशास्त्र विभागातर्फे हाड ठिसूळता तपासणी शिबिर नुकतेच संपन्न झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख हे तर उद्घाटक बधिरीकरणशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख डॉ.वैष्णवी कुलकर्णी या होत्या.

या कार्यक्रमास अस्थिव्यंगोपचार शास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. राजेश अंबुलगेकर, वैद्यकीय अधिक्षक डॉ.वाय.एच.चव्हाण यांची उपस्थिती होती. या शिबिरामध्ये एकूण 167 रुग्णांची हाड ठिसूळता तपासणी करण्यात आली. ज्यामध्ये 40 वर्षे वयाच्या वरील 102 महिला व 60 वर्षावरील 65 पुरुषांचा सहभाग होता. तपासणी करण्यात आलेल्या रुग्णांमध्ये जवळपास 80 टक्के रुग्णांमध्ये हाडांची ठिसूळता आढळून आली. या रुग्णांना अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, डॉ. वैष्णवी कुलकर्णी व डॉ.राजेश अंबुलगेकर यांनी हाडातील कॅल्शियम वाढवण्याबद्दल मार्गदर्शन केले. रुग्णांना अस्थिव्यंगोपचार शास्त्र विभागातर्फे मोफत उपचार देण्यात आले.

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त भौतिकोपचार शास्त्र विभागातर्फे मागील 7 वर्षांपासून दरवर्षी हाड ठिसूळ तपासणी शिबिर राबवण्यात येते. या शिबिर कार्यक्रमाचे डॉ. अर्चना केसराळे व डॉ.रवी वट्टमवार, भौतिकोपचार तज्ञ, भौतिकोपचार शास्त्र विभाग यांनी यशस्वीपणे आयोजन केले.

Previous articleजागतिक महिला दीना निम्मित जिजाऊ ब्रिगेड तर्फे महिला आरोग्य मार्गदर्शन आणि कराटे प्रशिक्षण
Next articleशासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयातर्फे “बालरक्षा” किटचे वितरण.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.