Home बीड थरारक आपघात! परळी-गंगाखेड रस्त्यावर खोदकाम; चालता ट्रक कोसळला खड्ड्यात चालक व सहाय्यक...

थरारक आपघात! परळी-गंगाखेड रस्त्यावर खोदकाम; चालता ट्रक कोसळला खड्ड्यात चालक व सहाय्यक जखमी

63
0

आशाताई बच्छाव

IMG_20240310_100028.jpg

थरारक आपघात! परळी-गंगाखेड रस्त्यावर खोदकाम; चालता ट्रक कोसळला खड्ड्यात चालक व सहाय्यक जखमी

_वडगाव वसाहत जवळ आपघात: नागरिकांच्या सतर्कतेने वाचले दोन जीव_

परळी दि १०  राष्ट्रीय महामार्ग क्र.३६१ फ वर सध्या गंगाखेड-परळी दरम्यान रस्त्याचे काम सुरु आहे.परळीपासुन जवळच असलेल्या वडगाव वसाहत जवळ काल सायंकाळी ०५ वा. सुमारास थरारक आपघात घडला. रस्त्यावर दोन्ही बाजुंनी खोदकाम करण्यात आलेले आहे. गंगाखेडकडून येणारा एक ट्रक रस्त्याच्या बाजुने असलेल्या खड्ड्यात जाउन कोसळला. चालता ट्रक कोसळत असतांनाचा थरार रहदारीच्या रस्त्यावर बघायला मिळाला.या आपघातात चालक व सहाय्यक असे दोन जण जखमी झाले. सुदैवाने नागरिकांच्या सतर्कतेनमुळे दोन जीव वाचले आहेत.
परळी – गंगाखेड रस्त्यावरील दगडवाडी ते वडगाव वसाहत यादरम्यान पुलाचे व रस्त्याचे काम करण्यासाठी खोदकाम करण्यात आले आहे. याठिकाणी दि.०९ मार्च रोजी सायं.०५:०० वा.सुमारास गंगाखेडकडून येणारा ट्रक क्रमांक एम एच १२ एन एक्स ८३६७ वेगाने येत असताना रस्त्याचा अंदाज न आल्याने चालकाचा ताबा सुटला.चालता ट्रक रस्त्याच्या कडेला जात खड्ड्यात जावून कोसळला. या आपघातात चालक व अन्य एकजण ट्रकच्या कॅबिनमध्येच आडकून पडले होते. मात्र हा थरारक आपघात घडत असतांना रस्त्यावरील जाणारी वाहने व रस्त्याच्या कामावरील लोकांनी बघितलेले होते.तातडीने या नागरिकांनी मदतकार्य करुन अडकलेल्या दोघांना बाहेर काढले.या आपघातात ट्रक चालक दयानंद आत्माराम पुयनर वय ३४ रा.पांगरी ता.गंगाखेड व सहाय्यक महादेव गंगाधर कोटंबे वय २९ रा.राणीसावरगाव ता.गंगाखेड हे जखमी झाले असुन त्यांच्यावर परळी वैजनाथ उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Previous articleसावित्रीबाई फुले स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन
Next articleमहाकाली नगरी चंद्रपुर मध्ये पांचव्या वर्धापन दिन थाटात संपन्न ..
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here