आशाताई बच्छाव
मोबाईल साधा सोपा…!
पण… आता तुमची करणार पोलखोल…!!
(राजेंद्र पाटील राऊत)
मालेगाव – विज्ञानयुगात तंत्रज्ञानाने खूप काही प्रगती केली असली आणि सर्वसामान्य माणसाला मोबाईलच्या मायाजाळात “स्मार्ट”बनविले असले तरी आता मोबाईल वापरकर्त्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे.
आजपर्यंत मोबाईल फक्त एक चैनीची व गरजेची वस्तू म्हणून जे लोक या मोबाईलकडे पाहत होते आणि मोबाईलला सहजपणे साधा सोप्पा समजून आपले दैनंदिन व्यवहार पार पाडीत होते.त्यांना आता बहुधा हे देखील माहित नसेल की, कालपर्यंत ज्या मोबाईल वरून आपण सहजासहजी कुणालाही खोटे बोलून सांगून जायचो की,अमूक गावाला आहे तमूक ठिकाणी आहे.या सगळ्या खोटेपणाच्या प्रकाराला आता आळा बसणार असून, गुगलने यावर पर्याय शोधला असून आपले थेट लोकेशन दरमहा आपण कुठे होतो? कोणत्या गावाला अथवा कोणत्या हाँटेलमध्ये किती तारखेला किती वाजेपासून किती वाजेपर्यंत थांबलो होतो या सगळ्यांची पोलखोल आता होणार असल्याने खोटे बोलणा-यांचे मात्र गुगलच्या या निर्णयामुळे धाबे दणाणले आहे तर खरे वागणा-यांना या गुगलकडून दरमहा महिनाभराचे मिळणाऱ्या लाईव्ह लोकेशन मुळे काही अंशी दिलासा मिळाला आहे.दरम्यान “युवा मराठा”ने काही जणांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता बहुतेक जणांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले की,गुगलचे हे दरमहा महिनाभरातील आपले लाईव्ह लोकेशन प्रदशिर्त करणे म्हणजे हा व्यक्तिगत स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रकार असल्याचे म्हटले आहे.