Home मुंबई आई आणि मुलगा कुणालने प्रथमकच रक्तदान करून केले पुण्याचे काम

आई आणि मुलगा कुणालने प्रथमकच रक्तदान करून केले पुण्याचे काम

221

आशाताई बच्छाव

IMG_20240223_081706.jpg

आई आणि मुलगा कुणालने प्रथमकच रक्तदान करून केले पुण्याचे काम
युवा मराठा न्यूज
सविता तावरे- मुंबई स्पेशल रीपोर्टर
भारती फाउंडेशन डोंबिवलीचे अध्यक्ष श्री सूर्यकांत पारधे ह्यांनी त्यांची मुलगी भारती चा थेलेस्मिया आजाराने मृत्यू झाला आणि म्हणून अश्या अजारग्रस्त रुग्णांना रक्त पुरवण्यात होणारे त्रास कुणाला होवू नये म्हणून भारतीच्या नावाने संस्था काढून थेलेस्मिया रुग्णांना व इतरांना रक्त मोफत पुरवण्याचे कार्य गेल्या सात वर्षापासून करीत आहे. जे जे महानगर ब्लड बँक आणि लाईफ लाईन ब्लड बँक यांच्या सहकार्याने मंगळवार, 2024 नाना नानी पार्क, मनापाडा रोड, डोंबिवली पूर्व येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले होते. त्या शिबिराचे आवाहन उज्ज्वला (आई) यांनी फेसबुक पोस्टचा माध्यमातून पाहिले आणि त्यांनी त्यांच्या नुकतेच 18 वर्ष पूर्ण झालेला त्यांचा मुलगा कुणाल किरण पवार हा बऱ्याच वर्षा पासून मलाही रक्तदान करायचे आहे असे सांगत असल्याने कॉलेजला गेलेल्या मुलाला कॉल करून रक्तदानाबद्धल कळवले आणि त्याने लगेच होकार दिला. भारती फाउंडेशनने दिलेल्या नंबर वर संपर्क साधून रक्तदान करण्याची इच्छा बोलून दाखवली, तसेच घरी येवून जेवण उरकून लगेच तयार झाला आणि त्या वेळी त्यांच्या मुलाचा चेहेऱ्यावर आनंद पाहण्यासारखा होता. कारण आपण गरजूंना जीवन दान देण्याचे चांगले कार्य करायला चाललो आहोत आणि त्याने मिळेल त्या वाहनाने शिबिर स्थळी उपस्थित राहून रक्तदान शिबिरामध्ये आपले पहिले रक्तदान केले, आणि रक्तदान करताना आईकडे पाहून म्हणत होता आई मी आज काहीतरी चांगले काम केले ना मला खूप बरे वाटले. कारण आपण रक्तदान केल्याने तीन रुग्णांना जीवनदान मिळते, आणि आपण खरोखरच तीन जणाचे संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचवू शकतो, आपण रक्तदानासाठी दिलेले दहा मिनिट आणि तीन जीवनदान. खरोखर चांगले वाटले रक्तदान केल्याने मला खूप बरे वाटले, आणि कुणाल ह्या पुढे दर तीन महिन्यांनी रक्तदान करेन असे सांगत असताना आईला मुलाने शुरुवात केलेल्या कार्याला पाहून मन भरून आले आणि त्याला शाबासकी दिली आणि घट्ट मिठी मारली, कौतुक केले.
खरेच आपल्या मुलांना घडवणे हे आपल्या हातात आहे फक्त आपली चांगली शिकवण आणि संस्कार हेच त्यांचे चांगले भवितव्य घडवण्यासाठी कारणीभूत ठरते.
त्यावेळी वेळी आयोजक भारती फाउंडेशन चे अध्यक्ष आणि मान्यवर मंडळींनी कुणालची पाठ थोपटली आणि त्याचा स्मृतिचिन्ह, रक्तदान करतानाचे फोटो प्रिंट केलेले कप, आणि पुष्पगुच्छ देवून सन्मान केला. तेव्हा कुणालच्या आईने मुलाला रक्तदान करण्याची संधी दिल्याबद्द्ल आयोजकांचे आभार मानले.

Previous articleकथा -ऋणानुबंध
Next articleसंत रोहीदास कुलभूषण कवी व तत्कालीन प्रचलित सामाजिक विद्वान होते
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.