आशाताई बच्छाव
नांदेडला होणार रिपब्लिकन सेनेचा वर्धापन दिन साजरा
रिपब्लिकन सेनेच्या प्रमुख पदाधिकार्यांची नियोजन पुर्व बैठक नांदेड येथे संपन्न
नांदेड (संजीव भांबोरे) रिपब्लिकन सेना राजकीय पक्षांचा वर्धापन दिन 21 नोव्हेंबर 2023 रोजी आहे.
मुंबई मध्ये झालेल्या रिपब्लिकन सेना महाराष्ट्र प्रदेश कमिटी बैठकीत बोलताना राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर साहेब यांनी नांदेड मध्ये वर्धापन दिन साजरा करण्याच्या सुचना नांदेड जिल्हा पदाधिकारी यांना दिल्या होत्या.
त्या अनुषंगाने मराठवाड्यातील प्रमुख पदाधिकारी यांची बैठक प्रदेश महासचिव प्रा.युवराज धसवाडीकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
दीक्षाभूमी ते चैत्यभूमी संविधान बचाव यात्रा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष काकासाहेब खांबाळकर यांच्या नेतृत्वात नागपुरातून निघाली असुन 20-21नोंव्हेबर नांदेड मध्ये दाखल होणार असून रॅलीचे भव्य स्वागत करण्याचे नियोजन करण्याचे सूचना देण्यात आल्या.
यावेळी वर्धापन दिन नियोजन संदर्भात चर्चा करुन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावेत तसेच महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातुन रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी नांदेड मध्ये येणार असुन त्यांच्या राहण्याची गैरसोय होऊ नये याची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.
यावेळी आयोजनाची संपुर्ण जबाबदारी महाराष्ट्र प्रदेश सचिव श्रीपती ढोले सर व महाराष्ट्र प्रदेश सचिव माधवदादा जमधाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर जिल्हाध्यक्ष संदीपजी माजंरमकर , दक्षिण जिल्हाध्यक्ष अनिलजी शिरसे यांच्या खांद्यावर टाकण्यात आली.
दोन्ही जिल्हाध्यक्ष यांनी वर्धापन दिन मोठ्या उत्साहात यशस्वी करु असे आश्वासन दिले.
यावेळी प्रदेश संघटक भैय्यासाहेब भालेराव, युवा प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे, मराठवाडा अध्यक्ष मिलिंदजी बनसोडे, मराठवाडा उपाध्यक्ष नागराज ढवळे, मराठवाडा सचिव एंड मारोती साबळे, युवा मराठवाडा निरिक्षक नितीन बनसोडे, जिल्हा सचिव शंभर थोरात, दक्षिण युवा जिल्हाध्यक्ष प्रशांत गोडबोले, उत्तर युवा जिल्हाध्यक्ष रवींद्र हडसे, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अंकुश सावते, मराठवाडा उपाध्यक्ष मधुकर झगडे, जेष्ठ नेते शिवाजी सोनकांबळे, उद्योग आघाडी जिल्हाध्यक्ष रेड्डी आण्णा,महिला आघाडी प्रेमीलताई वाघमारे,गवळताई कदम,लक्ष्मीताई शिंदे, परभणी शहराध्यक्ष निलेश डुमने, सुत्रसंचलन जिल्हा सरचिटणीस रविंद्र सोनकांबळे यांनी केले तर आभार जिल्हा सचिव शंभर थोरात यांनी मानले.