आशाताई बच्छाव
डाबली गावात मराठा आरक्षणासाठी लाक्षणिक उपोषण राजकीय नेत्यांना गावबंदी!
(आंशूराज पाटील राऊत)
मालेगांव- मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आणि मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ डाबली गावात लाक्षणिक उपोषण आंदोलनास सुरुवात झाली आहे.
याबाबत सविस्तर असे की,मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जालन्यातील अंतरावली सराटी येथे बेमुदत उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनासाठी मालेगांव तालुक्यातील डाबली गावात लाक्षणिक उपोषण आंदोलन सुरु करण्यात आले असून,मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत गावात कोणत्याही राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आलेली आहे.या लाक्षणिक उपोषण आंदोलनात डाबली गावचे सरपंच व सरपंच परिषद संघटनेचे अध्यक्ष एकनाथ भोसले यांचेसह गावातील सचिन निकम, माजी सरपंच सतिश ढगे,पोलीस पाटील दादाजी बच्छाव,बापू जगताप,अरुण अहिरे,अशोक बच्छाव,पांडुरंग जगताप, रमेश बच्छाव,भटा चौधरी, दुर्गश भोसले,किरण भोसले,तुषार भोसले,ज्ञानेश्वर निकम, जितेंद्र अहिरे,तुषार अहिरे,अनंत निकम,मयुर निकम आदीसह डाबली ग्रामस्थ बहुसंख्येने या उपोषण आंदोलनात सहभागी झाले होते.