Home भंडारा महाराष्ट्र मुद्रांक विक्रेत्या संघटनामार्फत दिनांक 30 ऑक्टोबर रोजी एक दिवसीय काम बंद...

महाराष्ट्र मुद्रांक विक्रेत्या संघटनामार्फत दिनांक 30 ऑक्टोबर रोजी एक दिवसीय काम बंद आंदोलन

100

आशाताई बच्छाव

Screenshot_20231029-180221_WhatsApp.jpg

महाराष्ट्र मुद्रांक विक्रेत्या संघटनामार्फत दिनांक 30 ऑक्टोबर रोजी एक दिवसीय काम बंद आंदोलन

 

विविध मागण्यांसाठी मुद्रांक विक्रेत्या संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

 

संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी )-महाराष्ट्र मुद्रांक विक्रेत्या संघटनामार्फत दिनांक 30 ऑक्टोबर रोजी पुकारलेल्या एक दिवसीय काम बंद आंदोलनामध्ये सामील होण्याबाबत जिल्हाधिकारी भंडारा, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व दुय्यम निबंधक भंडारा यांना महाराष्ट्र मुद्रांक विक्रेत्या संघटनेच्या वतीने दिनांक 27 ऑक्टोबर 2023 रोजी निवेदन सादर करण्यात आले.

 

भंडारा : जिल्ह्यातील मुद्रांक विक्रेते आणि दस्त लेखक मागील अनेक वर्षांपासून शासनाचे कर्तव्य पार पडत आहेत. मात्र मागील काही दिवसाअगोदर मीडिया आणि न्यूज पेपरच्या माध्यमातून असे लक्षात आले की, 100 व 500 रुपयांचा मुद्रांक हे संपुष्टात आणण्याकरिता प्रस्ताव दाखल झालेली आहेत. तो प्रस्ताव पारित झाला असेल तर अनेक मुद्रांक विक्रेता आणि दस्त लेखक यांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे. आणि त्यांचेवर अवलंबून असलेले व्यक्ती परिवार त्यांचे मुले बाळे यांच्यावर देखील उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे तब्बल या व्यवसायावर 4500 ते 5000 मुद्रांक विक्रेत्या आणि त्यांचे कुटुंबीय अवलंबून आहेत. त्यांच्यावर देखील उपासमारीची वेळ येईल. करीता 100 आणि 500 मुद्रांक विक्री बंद करू नये तसेच आम्हाला बेरोजगार करू नये. याकरिता दिनांक 30 ऑक्टोबर 2023 रोजी एक दिवस मुद्रांक विक्री आणि दस्त लेखन बंद करण्याबाबत निवेदन सादर करण्यात आले आहे. सदर निवेदन जिल्हाधिकारी भंडारा, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार भंडारा तसेच दुय्यम निबंधक भंडारा यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदन देतेवेळी भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव, जनसेवक पवन मस्के, मुद्रांक विक्रेते आणि दस्तलेखक नरेंद्र रामटेके, विलास धांडे, राजू बनसोड, हर्षवर्धन गोस्वामी, दिनेश मडामे, मायावती सुखदेवे, रणजीत कोटांगले, प्रदीप हाडगे, जे एस दहिवले, चंद्रशेखर मरस्कोल्हे, राजीक सय्यद, योगेश मेश्राम, जौसीक सय्यद, सुचिता बनसोड, विनोद वासनिक, ओमप्रकाश गोंडाने, सतीश कुमार नागदेवे, कुमार मंगल बनसोड, डी.डी. मस्के, शशिकांत नागदेवे आणि अनेक मान्यवर तसेच संघटनेचे सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.

Previous articleनांदगाव तालुक्यातील नाग्या साग्या धरणा जवऴील हॉटेल गोल्डन पॅलेसमध्ये सुरू असलेला कुटंन खाना उध्वस्त…
Next articleनागपूर येथे महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभाची बैठक संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.