राजेंद्र पाटील राऊत
गांव तस चांगल…पण ! आजचे गांव व-हाणे,ता.मालेगांव मालेगांव,(राजेंद्र पाटील राऊत युवा मराठा न्युज नेटवर्क)- काही गावाची एक वेगळी अशी खास ओळख असते,कुठल्या तरी नावाने या गावाची ओळख सर्वदूर होत असते.असेच एक गाव नाशिकच्या मालेगांव तालुक्यात असून,मनमाड पुणे महामार्गावर असलेले हे गाव पाच मारुतीचे व-हाणे म्हणूनही ओळखले जाते.या गावाला स्वर्गीय लोकनेते तुकाराम (भाऊ) शंकर पवार यांचा वारसा लाभलेला आहे.तुकाराम शंकर पवार यांच्या कार्यकाळात या गावाचे नाव ख्यातीप्राप्त होते.मात्र आज या गावाची दुरावस्था बघितली तर नक्कीच म्हणावेसे वाटते.गाव तसे चांगले…पण! या गावाची आजच्या घडीला सगळ्यात मोठी दुरावस्था सुरु आहे.आय.एस.ओ.चे सर्टीफीकेट मिळाल्याचा डंका मिरविणारे हे गाव आज रोजी समस्यांच्या चक्रयुव्हात सापडलेले आहे.गावात पिण्यासाठी मुबलक पाणी नाही,कधी तरीच आठ दहा दिवसात पाणी येते.या गावाला या अगोदरही निर्मलग्राम पुरस्कार मिळालेला होता मात्र या गावात महिलांना सुलभ शौचालयाची कुठलीही खास व्यवस्था नाही.माय-माऊलींना उघडयावरच शौचास बसावे लागते यापेक्षा मोठी शोकांतिका कोणती असू शकते?या गावाला अतिक्रमणाचा विळखा पडलेला असून, अक्षरशः स्मशानभूमीवरील रस्ताही अतिक्रमणाच्या विळख्यातून सुटलेला नाही.जेथे बडया धेंडानीच अतिक्रमणे करुन ठेवलीत तेथे सामान्य गोरगरीब नागरीकांची गोष्टच वेगळी.जेथे कागदोपत्री बनवाबनवीचा खेळ करुन खोटया व बनावट कागदपत्रांचा मेळ बसत नाही अशा व-हाणे ग्रामपंचायतीला अद्यावत व सुस्थितीत दप्तर असल्याचा आय.एस.ओ.दर्जाचा पुरस्कार देणे,म्हणजे खोटयाचे समर्थन करुन चुकांवर पांघरुण घालण्यासारखा हा प्रकार आहे.दोन पाच हजार रुपये मोजा अन आय.एस.ओ.सर्टीफीकेट मिळवा…मग त्यात कर्तबगारी नसली तरी बेहतर! व-हाणे गावात आजपर्यंत ग्रामपंचायत प्रशासनाकडून सर्वसामान्यांच्या प्रश्नावर ठोस अशी विकासात्मक कामगिरी केल्याचे दिसून येत नाही.या गावात एक ना अनेक समस्या आज रोजी “आ” वासून उभ्या ठाकलेल्या आहेत.तरीही पैसे मोजून,मँनेज करुन ग्रामपंचायतीला मिळविलेले आय.एस.ओ सर्टीफीकेट म्हणजे बंदर कहता है मेरीही…..लाल अशातला हा प्रकार आहे.दुसरे काय?