आशाताई बच्छाव
जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्थेत दोन दिवस अंशत: बदल
शत्रुघ्न काकडे पाटील:-ब्युरो चिफ (युवा मराठा न्युज नेटवर्क)
परभणी, :- परभणी-पाथरी राष्ट्रीय महामार्गावर पेडगाव येथे मुस्लिम बांधवांच्या वार्षिक इज्तेमा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे या राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यातील मार्गात उद्या बुधवारपासून दोन दिवस अंशत: बदल करण्यात आला आहे.
परभणी – पाथरी या राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. या रस्त्यावरील वाहतूक इज्तेमा कार्यक्रमादरम्यान चालू राहिल्यास वाहतूक खोळंबण्याची व अपघात होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने परभणी – पाथरी या महामार्गावरील वाहतूक 7 ते 8 डिसेंबर या कालावधीसाठी पुढील प्रमाणे वळविण्यात आली आहे. या वाहतूक व्यवस्थेत बदल करुन सेलूकडून मानवतरोड मार्गे येणारी जड वाहने कोल्हापाटी (मानवतरोड) येथून मानवत – पोखर्णी फाटा – पाथरी – उमरी मार्गे परभणीकडे वळविण्यात आली आहे.
तसेच गंगाखेड रोड – वसमत रोड – जिंतूर रोडवरुन येणारी वाहने पेडगाव मार्गे न जाता ती गंगाखेड रोडवरील उमरी फाटा येथून पाथरीकडे वळविण्यात आली आहे. मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे कलम 33(1)(ख) अन्वये सदर आदेश देत असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी कळविले आहे.