Home नाशिक भारतीय अन्न महामंडळाच्या राज्य सदस्य पदी नांदगाव चे बापु शिंदे यांची निवड

भारतीय अन्न महामंडळाच्या राज्य सदस्य पदी नांदगाव चे बापु शिंदे यांची निवड

72
0

आशाताई बच्छाव

IMG-20221004-WA0008.jpg

भारतीय अन्न महामंडळाच्या राज्य सदस्य पदी नांदगाव चे बापु शिंदे यांची निवड
नांदगांव प्रतिनिधी अनिल धामणे                     धनगर समाज संघर्ष समिती चे प्रदेशाध्यक्ष सिध्देश्वर बापु शिंदे यांची भारत सरकारच्या ग्राहक व्यवहार व अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय अंतर्गत भारतीय अन्न महामंडळाच्या सल्लागार पदी निवड करण्यात आली,
केंद्रीय मंत्री ना. पियुष गोयल, ना.टी.संतोष , पद्मश्री डॉ विकास महात्मे यांच्या विशेष शिफारशी ने ही निवड करण्यात आल्याचे पत्र केंद्रीय मंत्रालयातुन प्राप्त झाले आहे.
गेली अनेक वर्षांपासून बापु शिंदे हे भारतीय जनता पार्टी तसेच भटके विमुक्त जाती जमाती साठी काम करीत आहे. धनगर समाजाचे प्रदेशाध्यक्ष असल्याने त्यांनी या उपेक्षित जाती जमातीच्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्न करीत आहे.
गोरगरीबांना रेशन कार्ड, घरकुल, मेळपाळांना शेळ्या मेंढ्या चरण्यासाठी चराऊ कुरणे, फिरते रेशनकार्ड, मतदार यादीत नावे, यासाठी अनेक वेळा आंदोलन केले आहे.
पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या कार्याची आणि प्रमाणिकतेची दखल घेऊन त्यांना न्याय दिल्याची भावना व्यक्त होत आहे.
बापु शिंदे त्यांच्या निवडी बद्दल भाजपा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावन्नकुळे, केंद्रीय आरोग्य व कुटूंब कल्याण राज्यमंत्री भारतीताई पवार, केंद्रीय कायदामंत्री एस पी सिंग बघेल, भटके विमुक्त आयोगाचे अध्यक्ष दादा इदाते,खा रामदास तडस, भटके विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष नरेंद्र पवार,आ.सुहास कांदे, यांनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here