Home बुलढाणा ऐन दसरा, दिवाळी सारख्या सणासुदीच्या दिवसात जिल्ह्यातील अनेक गोदामात स्वस्त धान्यातील योजना...

ऐन दसरा, दिवाळी सारख्या सणासुदीच्या दिवसात जिल्ह्यातील अनेक गोदामात स्वस्त धान्यातील योजना पडल्या अपुऱ्या

48
0

आशाताई बच्छाव

IMG-20220927-WA0017.jpg

ऐन दसरा, दिवाळी सारख्या सणासुदीच्या दिवसात जिल्ह्यातील अनेक गोदामात स्वस्त धान्यातील योजना पडल्या अपुऱ्या

युवा मराठा वेब न्युज पोर्टल
प्रतिनिधी-रवींद्र शिरस्कार,संग्रामपुर

बुलढाणा जिल्ह्यातील सरकारी स्वस्त धान्य दुकानदारांची संख्या जवळपास १५५० असून त्यांच्या एकूण १६ गोडाऊन गेल्या मागील काही महिन्यांपासून जिल्ह्यातील स्वस्त धान्य वाहतुकीचे कंत्राट हे यवतमाळ येथील सिल्वर रोडलाईन यांना दिलेले असल्याची माहिती आहे या काळामध्ये स्वस्त धान्य वाहतुकीचा गाळा हा अस्थिर असल्याची परिस्थिती झाली आहे .आगामी काळात दसरा दिवाळी यासारखे महत्त्वाचे सण असून सुद्धा जिल्ह्यातील दोन तीन तालुके वगळता जवळपास १० तालुक्यातील गोदामात धान्याचा तुटवडा असल्याची स्थिती आहे. राजकीय गदारोळात मग्न असलेल्या कोणत्याही लोकप्रतिनिधींचे याकडे लक्ष नसल्याचे चित्र आहे
सध्या नवरात्र उत्सव सुरू झाला असून पुढील काही दिवसातच हिंदूंचे सर्वात मोठे मानल्या जाणारे दसरा दिवाळी हे सण आहेत पूर्वी दसरा दिवाळी सारख्या सणाला रेशन दुकान वर अनेक वस्तू ग्राहकांना अल्पशा दरात मिळत होत्या. गेल्या करोना काळापासून मोफत धान्याचा फंडा सुरू झाला असून निम्मे धान्य कमी किमतीत व जवळपास तेवढेच धान्य प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेमार्फत मागील दोन वर्षापासून मोफत वाटप सुरू आहे. मात्र दसरा दिवाळी सारख्या ऐन सणासुदीच्या काळामध्ये पंतप्रधान गरीब कल्याण योजनेचा गहू सुद्धा गरिबांना या दसरा दिवाळी सारख्या उत्सव असणाऱ्या महिन्यांमध्ये मिळाला नाही.
त्यामुळे सर्वसामान्य जनतेत प्रचंड रोष दिसत आहे, त्याचप्रमाणे शेतकरी लाभार्थी योजनेचा गहू सुद्धा मागील तीन महिन्यापासून पूर्णतः बंद झालेला आहे काही स्वस्त धान्य दुकानदार यांनी सांगितलेल्या माहितीनुसार सदर योजना ह्या कायमच्या बंद झालेल्या नसून स्वस्त धान्य दुकानदारांनी धान्याच्या चलान फाडल्या असून वरून माल आल्यावर आम्ही वितरित करू असे सांगण्यात आले.

त्यामुळे सप्टेंबर महिना हा मोफत धन्यवाद असल्याचे वाटत असून मुदतवाढ मिळण्यासंदर्भात शासन स्तरावरून कोणत्याही हालचाली बुलढाणा, चिखली, खामगाव हे तालुक्के वगळता एकुण दहा तालुक्यातील दुकानदारांना फक्त रेगुलर च्या धान्याचा वाटप सुरू आहे त्यामुळे सणाच्या काळात मोफत धान्यापासून कार्ड धारक वंचित राहणार असून वाटपाकडे तांदुळाचे खूप जास्त प्रमाण आहे गव्हाचा कोठा शासनाने खूप कमी प्रमाणात केलेला आहे त्यामुळे खुल्या बाजारात गव्हाचे भाव हे प्रचंड वाढलेले आहेत याकडे कोणत्याही लोकप्रतिनिधीचे लक्ष नसून वरिष्ठ अधिकारी झोपेचे सोंग घेतल्यागत झाले असून राज्यात सरकार स्थिर नसल्याचे चित्र आहे.

Previous article! गं अंबे उदे! च्या गजरात भाविक भक्त तल्लीन
Next articleसंत साहित्याचे अभ्यासक व भारूडकार डॉ. रामचंद्र देखणे यांचे पुण्यात निधन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here