Home अकोला जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाचा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर

जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाचा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर

77
0

आशाताई बच्छाव

IMG-20220827-WA0045.jpg

जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाचा उपक्रम
विद्यार्थ्यांसाठी कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर

अकोला,(सतिश लाहुळकर ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) : जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाच्या वतीने जिल्ह्यातील इयत्ता ८ वी ते १२ वी च्या शालेय विद्यार्थ्यांसाठी वाहतुक नियम, रॅगिंग, व्यसनाचे दुष्परिणाम इ. विषयी कायदेविषयक मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले. दि.२० ते २५ या कालावधीत विविध विद्यालयात हा उपक्रम राबविण्यात आला.

महाराष्ट्र राज्य विधी सेवा मुंबई यांच्या निर्देशानुसार प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एस.के. केवले यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात भिमचंद खंडेलवाल विद्यालय, डाबकी रोड, जसनागरा स्कूल रिधोरा, कोठारी कॉन्व्हेंट विद्यानगर, महाराष्ट्र विद्यालय, जठारपेठ, भारत विद्यालय, तापडीया नगर, डी.आर. विद्यालय, सहकार नगर, प्राजक्ता विद्यालय, कौलखेड, मोहरी देवी कन्या विद्यालय, डाबकी रोड या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव यो. सु. पैठणकर, दिवाणी न्यायाधीश श्रीमती एस. ओ. पांडे, श्रीमती विभा धुर्वे, विधीज्ञ जी.के. खाडे, सुमेध डोंगरदिवे, श्रीमती दिप्ती वोराणी, गोपाल मुकुंदे, पोलीस हवलदार श्रीमती पुजा दांडगे, श्रीमती दीपाली नारनवरे, श्रीमती आश्विनी माने यांनी विविध विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक, विधी सेवा प्राधिकरणाचे अधीक्षक डी.पी. बाळे, संजय रामटेके, राजेश देशमुख, कुणाल पांडे, हरिष इंगळे, शाहबाज खान आदींनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here