Home पुणे नवी सांगवी येथील बाबुरावजी घोलप विद्यालय सांगवी या विद्यालयाच्या सन 1993-94 च्या...

नवी सांगवी येथील बाबुरावजी घोलप विद्यालय सांगवी या विद्यालयाच्या सन 1993-94 च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी होतकरू विद्यार्थ्यांना शूज चे वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित केला

80
0

आशाताई बच्छाव

IMG-20220825-WA0085.jpg

नवी सांगवी येथील बाबुरावजी घोलप विद्यालय सांगवी या विद्यालयाच्या सन 1993-94 च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी होतकरू विद्यार्थ्यांना शूज चे वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित केला
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी उमेश पाटील
आज गुरुवार दिनांक 25 ऑगस्ट 2022 रोजी विद्यालयातील गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना शूज चे वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रम च्या अध्यक्ष स्थानी विद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री शिवाजी पाडुळे होते. सुमारे 20 माजी विद्यार्थी या कार्यक्रम मध्ये सहभागी झाले होते. प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री बाळकृष्ण मापारी यांनी तर स्वागत श्री विलास निमसे यांनी केले. विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका संजना आवारी तसेच पर्यंवेक्षिका निवेदिता पोळ यांनी माजी विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत केले. यावेळी विद्यार्थितानी बनवलेल्या समूह गीत संग्रहाचे माजी विद्यार्थी यांचेकडून प्रकाशन केले गेले. माजी विद्यार्थ्यांनी या वेळी विद्यालयातील 50 विद्यार्थी यांस शूजचे वितरण केले. विद्यार्थ्यांनी असे कार्यक्रम आयोजित करून मदतीचा असाच ओढा चालू ठेवावा असे विचार अध्यक्ष शिवाजी पाडुळे यांनी आपल्या भाषणात प्रतिपादन केले.अध्यक्ष निवड सुजाता चासकर यांनी केले तर अनुमोदन मनकर्णिका बोठे यांनी केले. कार्यक्रम चे संपूर्ण सूत्रसंचालन संजय मेमाणे यांनी केले. आभार चंद्रशेखर वाघमारे यांनी केले. यावेळी पुढील माजी विद्यार्थी कार्यक्रम साठी उपस्थित होते.विजय साळुंखे, गणेश बालवडकर, सचिन पवार, शिवाजी पानसरे, किरण बोरकर,शरद ढोबळे, सुनील घोडराव,संतोष देवरकोंडा, युवराज पंडीत, सचिन गायकवाड, शिवाजी नवले,राहुल कदम,रेश्मा कांबळे, ज्योती बेल्हेकर सुवर्णा शिंगाडे ,सारिका कोंढरे,राजश्री..

Previous articleई-पीक पाहणीसाठी जिल्ह्यात 28 ऑगस्ट रोजी विशेष मोहिम – जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी
Next articleविधिमंडळाच्या पायऱ्यावर झालेल्या आंदोलनावरून विरोधी पक्षावर मुख्यमंत्री यांची जोरदार फटकेबाजी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here