आशाताई बच्छाव
गडचिरोली जिल्ह्यातील नुकसानीचे पुन्हा नव्याने सर्वेक्षण करुन नुकसान भरपाई द्यावी गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
आढावा बैठकीत आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांची कृषिमंत्री ना.अब्दुलजी सत्तार यांच्याकडे मागणी
कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे ,फळ पिकांचे जमिनीबाबत नागपूर येथे आढावा बैठकीचे आयोजन
गोसेखुर्द व मेडीगट्टा धरणाच्या प्रभावामुळे ३ वेळा जिल्ह्यातील पीक वाहून गेल्याने या नुकसानीची भरपाई देण्याची आवश्यकता
धानाच्या पऱ्यांच्या क्षेत्राची नुकसान दाखवण्यात आली असून नुकसान झालेल्या पूर्ण शेतीची माहिती दाखविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन
गोसेखुर्द धरणाच्या व मेडिगट्टा धरणाच्या प्रभावामुळे गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रचंड मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले असून सतत ३ वेळा पीक वाहून गेले ,पीक बुडाले, सडून गेले. परंतु या आढावा बैठकीमध्ये दाखवण्यात आलेल्या नुकसानीचे क्षेत्र अतिशय कमी असून केवळ धानाच्या पऱ्यांच्या क्षेत्राची नुकसान दाखवण्यात आली असून नुकसान झालेल्या पूर्ण शेतीची मात्र त्यातून माहिती वगळण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या सर्व नुकसानीची भरपाई मिळण्याची आवश्यकता असल्याने पुन्हा या नुकसानीचे सर्वेक्षणाची करण्यात यावे अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांनी या आढावा बैठकीमध्ये केली
मा. कृषिमंत्री ना.अब्दुलजी सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथील विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे ,फळ पिकांचे जमिनीबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीमध्ये आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी गडचिरोली जिल्ह्यातील नुकसानीची वस्तुस्थिती मांडली
बैठकीला राज्याचे कृषिमंत्री ना. अब्दुलजी सत्तार ,भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा.आमदार चंद्रशेखरजी बावनकुळे, गडचिरोली जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते
भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरण व तेलंगाना राज्याच्या मेडिगट्टा धरणाच्या पाण्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील लक्षावधी हेक्टर जमिनीचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पावसाळ्यामध्ये तीन वेळा शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. त्यांचे नुकसान प्रचंड झालेली असतानाही केवळ पऱ्यांच्या नुकसानीचे सर्वेक्षण प्रशासनाने सरकारकडे सादर केलेले आहे. हे पूर्णतः चुकीचे असून शेतकऱ्यांच्या पूर्ण नुकसानीची मदत त्यांना मिळालीच पाहिजे त्यासाठी पुन्हा सर्वेक्षण करण्याची आवश्यकता असून त्याबाबतचे निर्देश आपण द्यावेत अशी विनंती या बैठकीमध्ये आमदार महोदयांनी मंत्री महोदयांना केली आमदार यांच्या सूचनेवरून मंत्री महोदयांनी याबाबतचे निर्देश देण्यात येतील असे आश्वस्त केले.