आशाताई बच्छाव
निलेश भोये प्रतिनिधी भिमखेत युवा मराठा न्यूज नेटवर्क
अंतापुर शुक्रवार. दिनांक १२/8/2022 रोजी द्वारकाधीश कारखाना निर्मित साखर, वीज,ज् इथेनॉल, सेंद्रिय खत, सॅनिटायझर, कार्बन डायऑक्साइड, त्याचबरोबर डायर पासून पोटॅशयुक्त पावडर निर्मिती करण्याचा महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग यशस्वी झाला असून लवकरच दाणेदार खत तयार करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा लाभ देऊन कमी क्षेत्रात एकरी शंभर मॅट्रिक टनाच्यापुढे उसाचे उत्पन्न कसे घेता येईल यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न करावा असे प्रतिपादन अध्यक्ष शंकरराव सावंत यांनी केले. हरणबारी( ता. बागलाण) येथील धरणप्रकल्प येथे शेवरे येथील द्वारकाधीश साखर कारखान्या तर्फे जलपूजन, वृक्षारोपण व ऊस पिकावरील ड्रोन फवारणी करणे , शेतकरी मेळाव्यात सावंत बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी भालेराव यांनी प्रास्ताविक करून अध्यक्ष सावंत, उपाध्यक्ष चंद्रकला सावंत, निसर्गमित्र ,दै. सकाळचे प्रतिनिधी अरुणकुमार भामरे , ऊसउत्पादक विद्या भामरे यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. कारखान्याची शिस्त, गुणवत्ता, नियोजन वेळेवर मोबदला व नुकतेच डायर पासून पोटॅशूक्त पावडर बनवण्याचा यशस्वी प्रयोग झाल्याने माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे ,महाराष्ट्र शासन वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे शिवाजीराव देशमुख, वेस्ट इंडियन शुगरमिल्स असोसिएशनचे चेअरमन बी.बी. ठोंबरे तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दखल घेऊन त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कारखान्यावर पाठवून प्रत्यक्ष पहाणी केल्याने द्वारकाधीश चे नाव भारतात पोचले आहे. यासाठी ऊसउत्पादक शेतकरी, अधिकारी, कर्मचारी, उसकामगार वाहन चालक-मालक त्यांचीही भूमिका महत्त्वाची आहे असे सावंत यांनी सांगितले. माजी समाज कल्याण सभापती पोपटराव अहिरे, बाळासाहेब मोरानकर, काशिनाथ नंदन यांनी सावंत यांचे ८५ व्या वयात करत असलेले दमदार कार्य, तालुक्यातील अपूर्ण जलसिंचन योजना बाबत मनोगत व्यक्त केले. पाटबंधारे विभागाचे अधिकारी अभिजीत रौदळ ,के.पी. जाधव, नानाजी जाधव, बाळासाहेब महाजन, दिगंबर साळवे, अशोक पवार, साहेबराव साळवे, माधव सोनवणे ,शिवाजी भालेराव, बाळासाहेब करपे, भूषण नांद्रे ,विजय पगार, वैशाली पगार ,कैलास वाघ यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. सह्याद्री एरोस्पेस तर्फे ऊस पिकावर ड्रोन ने फवारणी कशी करावी याबाबत प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. शुभश्री भामरे, विलास निकम ,सुभाष पवार ,पोपट पवार ,शांताराम निकम, सुनील गवळी ,तात्या दीक्षित ,सोनू पाटील ,विलास पाटील, भावसा साळवे ,राजू सूर्यवंशी ,उद्धव अहिरे, यशवंत अहीरे, मदन खैरनार, साहेबराव महाजन, दिलीप भदाणे, साहेबराव पगार ,सतीश सोनवणे, महिंद्र अहीरराव, गोपी शेलार, मुरलीधर देशमुख ,नितीन कापडणीस, कैलास कुंदे, सुनील पगार, उद्धव नहीरे,राहुल देसले ,यादव गवळी उपस्थित होते. *फोटो- हरणबारी धरण येथे अध्यक्ष शंकरराव सावंत ,उपाध्यक्ष चंद्रकला सावंत यांच्या उपस्थितीत जलपूजन करताना विश्वहिंदू संघराष्ट्र महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, दैनिक सकाळचे प्रतिनिधी, निसर्गमित्र अरुणकुमार भामरे, सौ. विद्या भामरे सोबत नानाजी जाधव, पोपटराव अहिरे ,विलास निकम, बाळासाहेब महाजन ,निळू दीक्षित, ऊस उत्पादक शे हमतकरी. दुसऱ्या छायाचित्र ऊसपिकावर ड्रोनच्या मदतीने फवारणी कशी करावी याबाबत प्रात्यक्षिक पाहणी करताना अध्यक्ष सावंत ऊस उत्पादक शेतकरी.