Home गडचिरोली डॉ. किलनाके यांच्या घरासमोरून दुभाजक कट करून देण्यात यावे

डॉ. किलनाके यांच्या घरासमोरून दुभाजक कट करून देण्यात यावे

84

आशाताई बच्छाव

IMG-20220801-WA0015.jpg

डॉ. किलनाके यांच्या घरासमोरून दुभाजक कट करून देण्यात यावे

जिल्हा युवक काँग्रेसचे महासचिव कुणाल पेंदोरकर यांच्या नेतृत्वात देण्यात आले निवेदन                     गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

शेकडो नागरिकांच्या स्वाक्षरीचे निवेदन कार्यकारी अभियंता श्री.मिश्रा राष्ट्रीय महामार्ग विभाग गडचिरोली यांना देण्यात आले
कार्यकारी अभियंता यांनी मागणी पूर्ण करण्याचे सूचना अधिकाऱ्यांना दिले
मागील वर्षी गडचिरोली- चंद्रपूर या राष्ट्रीय महामार्गाचे सिमेंटिकरण करण्यात आले. त्यानंतर लगेच सार्वजनिक बांधकाम विभागा अंतर्गत दुभाजक व स्ट्रीट लाईटचे कामे करण्यात आले. त्यामुळे गडचिरोली शहराच्या सौंदर्यकरणात मोठ्या प्रमाणात भर पडली यात तिर मात्र शंका नाही. परंतु डॉ. किलनाके यांच्या हॉस्पिटल समोरून दुभाजक कट केले नसल्याने नागरिकांना येणे जाणे करणे करीता मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे गणेश नगर, अयोध्या नगर, शिक्षक कॉलनी, परिसरातील याचा नाहक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. डॉ. किलनाके हॉस्पिटलच्या मागे हजारो नागरिक वास्तव्यास असतात. त्या ठीकानी अनंता हॉस्पिटल सुद्धा आहे. स्वामी विवेकानंद शाळा सुद्धा आहे. तसेच बजाज शोरूनच्या मागील बाजूस सुद्धा शिक्षक कॉलनी परिसरात हजारो नागरिक वास्तव्य करतात. परंतु नागरिकांना डॉ. किलनाके यांच्या दवाखान्याजवळ दुभाजक येणे जाणे करणे करीत दुभाजक कट (मेडियन गॅप) करून देण्यात यावे. जेणेकरून या प्रभागातील नागरिकांना जाणे येणे करण्यास त्रास होणार नाही. त्याठिकावरून सध्यास्थितीत 600 मिटर अंतरापर्यत दुभाजक कट नसल्यामुळे नागरिकांना वाहने विरुद्ध दिशेने न्यावे लागते त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. आणि रोजच अपघात होत आहेत.तसेच एसटी महामंडळ च्या बसेस सुद्धा विरुद्ध दिशेने पिपरे पेट्रोल पपंवर डिझेल भरायला येत असतात त्यामुळे नागरिकांना गाड्या काढण्यास मोठ्या प्रमाणात मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. तरी महोदय आपणास विनंती आहे की, डॉ. किलनाके हॉस्पिटल समोरून दुभाजक कट करून देण्यात यावे जेणे करून दोन्ही साईडच्या नागरिकांना प्रवासाच्या दृष्टीने सोयीस्कर होईल आणि अपघाताचे प्रमाण कमी होतील.
अन्यथा युवक काँग्रेस कडून आपल्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी. आणि लवकरात येथील दुभाजक कट करून देण्यात यावे. ही नम्र विनंती. त्यावेळी निवेदन देताना जिल्हा युवक काँग्रेसचे महासचिव कुणाल पेंदोरकर, विश्वनाथ तलांडे, वासुदेव भोयर, मनोज इरकुलवार, मनीषा ढवळे, शरद गिरेपुंजे ,साई सिल्लमवार, बाळू मडावी, रुपेश टिकले, दिलीप बिट्टूरवार, अमित बिट्टूलवार यांचेसह अनेक नागरिक उपस्थित होते.

Previous articleजिंतूर तालुक्यातील कावी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी
Next articleकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले व आमदार विजय वडेट्टीवार यांची जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.