राजेंद्र पाटील राऊत
एटापल्ली तालुक्यात नक्षल्यांचे हत्या सञ सुरुच गाव पाटलाची केली हत्या।
गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क): एटापल्ली तालुक्यातील जाभिया गट्टा पोलिस मदत केंद्राअंर्गत येणाऱ्या डोडुर येथील गाव पाटलाची नक्षलवाद्यानी गळा दाबून हत्या केल्याची घटना दिं 24 मे मंगळवारला उघडकीस आली.
कुल्ले वजा कोवासी वय 42 वर्ष रा.डोद्दुर ता. एटापल्ली जि.गडचिरोली असे नक्षल्यांनी ठार केलेल्या मृतक इसमाचे नाव आहे.
23 मे ला मृतक तेंदुसंकलन केंद्रावर तेंदुपत्ता विकण्यासाठी गेला असता राञीच्या सुमारास नक्षल्यांनी तेंदुपत्ता संकलन केंद्रावरुन त्याचे अपहरण केले.व वट्टेली ते डोद्दूर रस्त्यावर त्याला बेदम मारहाण करुन त्याचा गळा दाबून हत्या केली. व मृतदेह रस्त्यावर फेकुन दिला.
घटनेची माहिती कळताच जाभिंया गट्टा पोलिस घटनास्थळी दाखल झाले.व शव हस्तगत करुन एटापल्ली येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
कुल्ले कोसावी यांनी नक्षल्यांनी विरोध केलेल्या रस्ता बांधकामात स्व:ता पुढाकार घेऊन रस्ता बांधकाम सुरु केल्यामुळे नक्षल्यानी हि हत्या केल्याची बाब समोर आली आहे.
एटापल्ली तालुक्यात नक्षल्यांचे हत्या सञ सुरुच असुन निरपराध आदिवासीचा यात नाहक बळी जात आहे.