राजेंद्र पाटील राऊत
मुखेड पंचायत समितीवर प्रशासक नियुक्ती
गटविकास अधिकारी भालके यांनी स्विकारला पदभार
नांदेड/मनोज बिरादार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क
मुखेड पंचायत समितीच्या सभापती पदासह उपसभापती व १२ सदस्यांचा पाच • वर्षाचा कालावधी १३ मार्च रोजी • संपल्यामुळे प्रशासकाची नियुक्ती केली असून गटविकास तुकाराम भालके यांनी मुखेड पंचायत समितीचा 7 प्रशासक पदाचा पदभार स्वीकारला आहे . पंचायत समितीच्या राजकीय कारकिर्दीत पाच दशकात पहिल्यांदाच प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे प्रशासकीय पदासह प . स . चा कारभार हाती आला आहे . मुखेड पंचायत समिती अंतर्गत १२ ९ ग्रामपंचायती असून या सर्व ग्रामपंचायतीवर येथून नियंत्रण ठेवले जाते . गावांच्या विकासासाठी १५ वा वित्त आयोगाचा भरघोस निधी , घरकुल योजना , मनरेगा पांदण रस्ता , विहीर बांधकाम , दलित वस्ती आदींसह विविध योजना पंचायत समिती मार्फत राबविल्या जातात . आता गटविकास तुकाराम भालके हे आगामी निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत प्रशासक म्हणून काम पाहणार आहेत . जि.प. च्या अध्यक्षा मंगारणी अंबुलगेकर यांसह ६ जि.प. सदस्यांचा पंचवार्षिक कार्यकाळ येत्या २० मार्च रोजी संपुष्टात येत आहे .
तालुक्यात पहिल्यांदाच नगरपालिका , पंचायत समिती व जिल्हा परिषद हे सर्व स्थानिक स्वराज्य संस्था लोकप्रतिनिधिंच्या निवडी विनाच रिक्त झाल्या असून सर्व सदस्यांचा पाच वर्षाचा कार्यकाळ संपत असल्यामुळे कार्यालयाचा कारभार प्रशासकाच्या हाती येत आहे . एक ते दीड महिन्यात बाजार समितीवर सुद्धा प्रशासकीय प्रशासक येण्याची शक्यता आहे , त्यामुळे यापुढे शासकीय कार्यालयावर प्रशासक राज पहावयास मिळणार आहे .