राजेंद्र पाटील राऊत
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटना करणार १० फेब्रुवारी रोजी तहसीलदार कार्यालय समोर धरणे आंदोलन…..
पालघर(वैभव पाटील विभागीय संपादक युवा मराठा न्युज नेटवर्क):-मौजे नवली पालघर ता.जि.पालघर येथील भुमापण क्रमांक व उपविभाग ४८/१/१/१/१/अ१ एकूण क्षेत्र २३.१३.८७ पैकी ०,७०,० हे आर. महाराष्ट्र सरकार गुरचरण जमिनीवर झालेले बेकायदेशीर कारखान्याचे बांधकाम निष्कासित करण्याकरिता उपविभागीय अधिकाऱ्यांनी २०१६ ला अतिक्रमण निष्कासित करण्याबाबत आदेश देऊनही तहसीलदार पालघर व मुख्याधिकारी नगर परिषद पालघर हे अधिकारी संबंधित अतिक्रमणावर कारवाई करत नसल्याने दिनांक १०- फेब्रुवारी पासून तहसीलदार कार्यालय पालघर समोर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे सर्व पदाधिकारी बेमुदत धरणे आंदोलन-उपोषण करणार आहेत.
पत्रकार हा चौथा स्तंभ ओळखला जातो. पत्रकार हा स्वतःच्या हितासाठी नव्हे तर जनतेच्या हितासाठी नेहमी तत्पर लढतो अशा या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेने जो हा धरणे आंदोलन- उपोषण घेतला आहे. या उपोषणाला MINORITIES DEMOCRATIC PARTY च पूर्ण पाठिंबा आहे. व या उपोषणात आम्ही सुद्धा सहभागी आहोत. MINORITIES DEMOCRATIC PARTY कडून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटना यांना १० फेब्रुवारी रोजी पत्र देण्यात येईल.
तसेच या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेच्या या बेमुदत धरणे आंदोलन-उपोषण करण्यात येत आहे. या धरणे आंदोलनात नागरिकांनी आपला सहभाग देऊन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचा यांना सहकार्य करावे.