राजेंद्र पाटील राऊत
घटस्फोटास कारण की, मुंबईतील खड्डे ; अमृता फडणवीस यांचा नवीन शोध..?
मुंबई (अंकुश पवार, मुंबई जिल्हा प्रतिनिधी, युवा मराठा वेब न्युज चॅनल अँड पेपर)
प्रदेश भाजपच्या जैन विभागाच्या ‘ कर्करोगमुक्त महाराष्ट्र अभियान ’ चे उद्घाटन अमृता फडणवीस यांनी केले. मुंबईत खड्डे व वाहतूक कोंडीमुळे अनेक जोडप्यांचे घटस्फोट होत असल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केली आहे.
त्यांच्या या वादग्रस्त विधानावर समाज माध्यमांवर प्रतिक्रिया उमटली. हा नवीन जावईशोध असल्याची खोचक टीका महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली असून अमृता फडणवीस यांचा तर्क हास्यास्पद आहे, असल्याचे म्हटले आहे.
त्यानंतर विविध मुद्दय़ांवर पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाल्या, मी जेव्हा मुंबईतील समस्यांवरून बोलते, तेव्हा माझे मानसिक संतुलन बिघडल्याची टीका केली जाते.
मी देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी आहे, हे तुम्ही विसरुन जा. मीही दररोज सामान्य स्त्रियांप्रमाणे घराबाहेर पडते. मलाही खड्डे आणि वाहतूक कोंडीमुळे त्रास होतो. मुंबईत वाहतूक कोंडीमुळे सुमारे तीन टक्के जोडप्यांचा घटस्फोट झाला आहे.
वाहतूक कोंडीत अडकल्याने बराच वेळ फुकट जातो. पती-पत्नी आपल्या कुटुंबाला पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत. त्यामुळे घटस्फोटांचे प्रमाण वाढल्याचा दावा अमृता फडणवीस यांनी मुंबई मेट्रो मेस संकेतस्थळ आणि नेदरलँडच्या एका संस्थेने मुंबईतील वाहतूक कोंडीबाबत केलेल्या सर्वेक्षणाच्या अहवालांच्या आधारे केला.
मुंबईत अनेक समस्या असून मेट्रोचे काम पुढे गेलेले नाही. एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न प्रलंबित आहे. पण महाविकास आघाडी सरकार त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. राज्य सरकार पक्षपाती असून कायदेशीर कारवाई करताना प्रत्येकाला वेगवेगळे निकष लावले जातात, अशी टीकाही त्यांनी केली.