Home उतर महाराष्ट्र ठेंगोडा ग्रामपंचायतीचा अजब कारभार,अनाथ मुली वा-यावर;दतक घेतांना नियमांचे उल्लंघन व पायमल्मली..!

ठेंगोडा ग्रामपंचायतीचा अजब कारभार,अनाथ मुली वा-यावर;दतक घेतांना नियमांचे उल्लंघन व पायमल्मली..!

477
0

राजेंद्र पाटील राऊत

ठेंगोडा ग्रामपंचायतीचा अजब कारभार,
अनाथ मुली वा-यावर ;दतक घेताना नियमांचे उल्लंघन व पायमल्ली..!
सटाणा,(नयन शिवदे तालुका ग्रामीण प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)- सटाणा तालुक्यातल्या ठेंगोडा ग्रामपंचायतीने गत दोन दिवसापुर्वी अनाथ मुली दतक घेऊन त्यांना वयाच्या अठराव्या वर्षापर्यत सुकन्या योजनेचा लाभ मिळवून देण्याचा कार्यक्रम वाजत गाजत घडवून आणला.त्यासाठी तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला खरा;मात्र या कार्यक्रमातून खरोखरच अनाथ,निराधार बेसहारा असलेल्या मुलींना कितपत प्राधान्य देण्यात आले अशी ओरड आता होऊ लागली आहे.
गरजू व पात्र मुलींना डावलून गर्भश्रीमंताच्या मुलींनाच या दतक योजनेची खैरात वाटली गेल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.वास्तविक ठेंगोठा गावात गरजू व पात्र अनाथ निराधार मुली असताना,ग्रामपंचायतीकडून दतक योजनेचा हा फार्स नेमका कशासाठी? राबविला गेला असाही प्रश्न यानिमिताने आता उपस्थित होत आहे.
अनाथ म्हणजे काय? दतक घेण्याचे नियम काय व कोणते? अनाथ म्हणजे नेमके काय? ज्या मुलीचे वडील कुठल्यातरी अपघातात मृत्यूमुखी पडले.तिच्या घरी खाण्या पिण्याची शिक्षणाची परवड आहे अशा मुलींना अनाथ म्हणून ओळखले जाते व त्यांनाच खरे तर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्राधान्य दिले जाणे गरजेचे असताना,दतक योजनेतून गर्भश्रीमंताच्या अनाथ? मुली दतक घेण्याच्या या उपक्रमामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.याची पडतळणी व्हावी अशीच अपेक्षा जनसामान्य आता व्यक्त करीत आहेत.सदर झालेल्या कार्यक्रमामुळे ठेंगोडा ग्रामस्थांत तीव्र नाराजीअसून,अनाथ मुली दतक योजनेच्या उदीष्टाला खरेपणाने न्याय द्यावा अशी मागणी आता पुढे येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here