राजेंद्र पाटील राऊत
वानखेड मध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा पुतळा जाळला! छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यावरून निषेध…
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी ब्युरो चिफ स्वप्निल देशमुख
कर्नाटकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर त्याचे महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. आज बुलढाणा जिल्ह्यातील वानखेड गाव मध्ये कर्नाटकातील त्या घटनेचा निषेध करत कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या प्रतिमा जाळल्या…तीन दिवसापूर्वी बेळगाव मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची काही समाजकंटकांनी विटंबना केली आहे. या घटनेचे बेळगाव सह महाराष्ट्रात त्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत.
आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध व्यक्त केला.याप्रसंगी वानखेडच्या सरपंचा श्रीमती मंगलाताई रंगभाल,उपसरपंच राजू भाऊ पाखरे, मनोज पालीवाल,नरेंद्र देशमुख, अमित रंगभाल, निलेश आंबुसकर,अनिल इंगळे,शिवाजी आमझरे,सुनील लोणे,बाळू सांगळे, लखन दबडकार, ज्ञानेश्वर घूले, सचिन मेंहेगे ,शाम पालिवाल, देविदास वरपे, शिवा हागे, जय मंगल पाखरे, विलास पारिसे, मारोति पाखरे, अक्षय बंड, गोपाल बदरखे,आशिष बंड यासह शेकडो शिवप्रेमी उपस्थित होते.