राजेंद्र पाटील राऊत
परत मागे फिरा मंत्री यड्रावकर मिनचेकरांना मुरलीधर जाधव यांचे आवाहन कोल्हापूर,(राहुल शिंदे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
वडगाव कृषी बाजार समिती निवडणुकीमध्ये विरोधी गटामध्ये सामील झालेले मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर व माजी आमदार मिणचेकर यांचा जाहीर निषेध मुरलीधर जाधव यांनी केला.
बाजार समितीच्या निवडणुकीत आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर व माजी आमदार सुजित मिणचेकर यांनी महाविकासआघाडी विरोधी भूमिका घेतली आहे वरिष्ठ नेते भाजप विरोधात
लढा देत असताना येथे त्यांच्या समर्थकांच्या सोबत गुप्तगू योग्य नाही पण त्याच्या कृत्याचा जाहीर निषेध केला. यड्रावकर जुन्या गटाचे काम करीत आहेत सामान्य कार्यकर्ता या निवडणुकीत लढत आहे त्यांना पाठिंबा द्या असे जाहीर आवाहन जिल्हाध्यक्ष मुरलीधर जाधव यांनी केले. शिवसेनेचे माजी आमदार मिणचेकर गटाचा भाजप पुरस्कृत आघाडीला पाठिंबा असल्याची काही दिवसापासून तालुक्यात चर्चा आहे. त्यांना कोणीही ओळखत नव्हते त्यांना शिवसेनेने ओळख करून दिली. त्यांनी हे विसरू नये. या पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष मुरलीधर जाधव, शहराध्यक्ष संदीप पाटील, संदीप दबडे, बबलू खाटीक, सागर साखळकर यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.




