राजेंद्र पाटील राऊत
गडचिरोली विभागाच्या 14 आंदोलनकत्या कर्मचार्यावर निलंबनाची कारवाई। गडचिरोली:(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)- राज्य परिवहन मंडळाचे शासनात विलगीकरन करावे या मुख्ख मागणीला घेवुन गडचिरोली विभागातील ब्रम्हपुरी ,गडचिरोली ,अहेरी आगारातील तब्बल 600 कर्मचार्यांनी बेमुद आंदोलन पुकारले आहे.12 दिवसापासुन चालु असलेल्या या आंदोलनामुळे बस सेवा ठप्प पडल्या आहेत त्यामुळे महामंडळाचे लांखोचे नुकसान झाले आहे.वारमंवार तोंडी सुचना देवुनही आंदोलनकते सेवेत दाखल न झाल्याने गडचिरोली विभाग प्रमुखांनी विभागांतर्गत येत असलेल्या तिंन्ही आगारातील 14 आंदोलनकत्यांना निलंबन केले आहे .यामुळे एकच खळबळ उडाली असून एसटी कर्मचार्याचे आता आंदोलन कोणते वळन घेते याकडे संपुर्ण जिल्हावासींयांचे लक्ष लागले आहे. मागील 12 दिवसापासुन सुरु असलेल्या आंदोलनामुळे लालपरीची चाके थांबली असल्याने एसटी महामंडळाला करोडो रुपयाचा तोटा सहन करावा लागत आहे.आंदोलनकत्यांना सेवेत पुर्ववत रुजु होण्यासाठी नोटिसह तोंडी सुचना दिल्यानंतरही कर्मचारी सेवेत समाविष्ठ न झाल्याने विभागाच्या वरिष्ठांनी आंदोलनकत्यांवर निलंबनाची तलवारच टांगली आहे गडचिरोली विभागाती तब्बल 600 कर्मचारी आंदोलनात सहभागी असल्याचे माहीती आहे.तिंन्ही आगारातील 14 आंदोलनकत्यांना निलंबित केल्याने आंदोलक करत्यामध्ये खळबळ उडाली आहे.तर मागण्या माण्या होईपर्यंत कर्मचार्यानी आंदोलन सुरु ठेवण्याचा निरधार केला आहे.