राजेंद्र पाटील राऊत
देगलूर बिलोली पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय.
मुखेड प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
देगलूर- बिलोली विधानसभा पोटनिवडणुक दिनांक 30/ 10 /2021 रोजी घेण्यात आली. त्याचा निकाल आज दिनांक 2 नोव्हेंबर 2021 रोजी जाहीर करण्यात आला. यामध्ये काँग्रेस कडुन जितेश अंतापूरकर भाजपाकडून सुभाषरावजी साबणे आणि वंचित कडून डॉ. इंगोले यांनी लढवली.
या निवडणुकीमध्ये मोठमोठे नेते केंद्रीय मंत्री आमदार पालकमंत्री अनेक सेलिब्रिटीज आपापल्या पक्षाकडून या विधानसभा क्षेत्रांमध्ये भरपूर प्रमाणात प्रचार केला. पण शेवटी काँग्रेसचे तरुण तडफदार युवा नेते जितेश अंतापुरकर यांना 1,08,840 मते घेऊन विजय मिळवला. तर सुभाषराव साबने यांना 66,872 मते मिळाली.
देगलूर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीत उमेदवार निहाय मिळालेली मते अशी आहेत.
जितेश अंतापूरकर – 1,08,789
सुभाषराव साबणे – 66,872
डॉ. उत्तम इंगोले – 11,347
विवेक सोनकांबळे – 465
नोटा – 1103
टपाली मतदान.
जितेश अंतापूरकर – 51
सुभाष साबणे – 35
डॉ उत्तम इंगोले – 01
विवेक सोनकांबळे – 02