अकोला करीता गर्व ची बाब
अकोला: अकोला शहर विभागाचे तत्कालीन विभागीय पोलीस अधिकारी उमेश माने पाटील यांना सर्वोत्कृष्ट अन्वेषणासाठी केंद्र शासनामार्फत दिले जाणारे केंद्रीय गृहमंत्री पदक-२०२१ जाहीर करण्यात आले.
सतिश लाहुळकर ब्युरो चीफ अकोला
केंद्र शासनाच्या गृहमंत्रालयामार्फत सर्वोत्कृष्ट तपास करणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदारांना केंद्रीय गृहमंत्री पदक देऊन सन्मानित केले जाते. त्या अनुषंगाने २०२१ करीता पोलीस तपासकामामध्ये उत्कृष्ट प्राविण्य दाखविणाऱ्या पोलीस अधिकारी, अंमलदारांच्या शिफारशी पोलीस महासंचालक कार्यालयामार्फत मागविण्यात आल्या होत्या.
त्यानुसार अकोल्याचे जिल्हा पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी अकोला शहर विभागाचे तत्कालीन विभागीय पोलीस अधिकारी उमेश माने पाटील यांनी रामदासपेठ पोलीस ठाण्यांतर्गत अनुसुचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ नुसार दाखल असलेल्या अतिशय गंभीर व संवेदनशील गुन्ह्याचा उत्कृष्टपणे तपास केल्याने केंद्रीय गृहमंत्री पदक-२०२१ साठी पोलीस महासंचालकांकडे प्रस्ताव पाठविला होता.
त्यानुसार, उमेश माने पाटील यांना केंद्रीय गृहमंत्रालयाकडून केंद्रीय गृहमंत्री पदक-२०२१ जाहीर करण्यात आले आहे. त्यांच्या निवडीबद्दल या यशाबद्दल पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी त्यांचे कौतुक केले.व सर्व कडून कौतुक होत आहे.