राजेंद्र पाटील राऊत
मांजरम परिसरात अवकाळी पावसाचा तांडव.
विज पडून म्हैस व वासरू जागीच ठार.
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार. (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
…मांजरम परिसरात सोमवारी दिवसभराच्या प्रचंड उकाड्या नंतर सायंकाळी पाच वाजता अचानक आकाशात मेघांचे तांडव सुरू झाले जवळपास पाऊण तास मेघ गर्जने सह अवकाळी जोरदार पाऊस झाला यातच हालक्या गारांच्या पावसाने हजेरी लावली. विजेने मांजरम येथील शेतकऱ्याच्या एका दुपती म्हैस व वासराचा जीव घेतला.
▪️कोरोना विषाणू बरोबरच मांजरम ला अवकाळी पावसाचा पंधरा दिवसांत दुसऱ्यांदा फटका
दि.२६ सोमवारी सायंकाळी पाच वाजता अचानक आकाशात ढग जमा झाले.दिवसभरच्या प्रचंड उकाड्या मुळे मेघ गर्जने सह पावसाला सुरुवात झाली.जवळपास पाऊन तास जोरदार पाऊस पडला.यातच हालक्या गारा बरसल्या. यातच सायंकाळी व सकाळी शेतीच्या मशागतीसाठी शिवारात असलेल्या व्यक्तींना अवकाळी पाऊसा पेक्षा विजेच्या कडकडाटाची भिती मनात होती. ती घटना घडली मांजरम येथील शेतकरी श्रीराम गणपतराव शिंदे यांच्या जागलीवर बांधलेली दुभती म्हैस व तिचे वासरू विज पडून जागीच ठार झाले. तसेच हाळद काढणी सुरू असून याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. अवकाळी पावसाने नुकसान झाल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केली आहे. तात्काळ महसूल विभागाच्या वतीने शेती पिकांचे पंचनामे करावेत. आर्थिक अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना योग्य न्याय देऊन मोबदला द्यावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.