राजेंद्र पाटील राऊत
नांदेड येथे रेमडीसीव्हर इंजेक्शन व ऑक्सिजन तात्काळ उपलब्ध करून व बंद पडलेले लसीकरण केंद्र चालू करा – राष्ट्रवादि काँग्रेस जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर
राजेश एन भांगे
नांदेड जिल्ह्यात कोरोना आजाराचा प्रसार दिवसेंदिवस वाढत असून अनेकांना या रोगाची लागण झाली आहे अशा कोरोनाग्रस्त रुग्णांना आवश्यक असणारे रेमडीसीवर इंजेक्शन व ऑक्सिजन ची गरज असतानाच नांदेडमध्ये याचा तुटवडा भासत आहे.
त्यामुळे गंभीर अवस्थेत असलेल्या कोव्हिड रुग्णांचा जीव धोक्यात येत असल्याने रेमडीसीवर इंजेक्शन व ऑक्सिजन लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावे अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नांदेड जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांनी निवेदनाद्वारे निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांच्याकडे केली आहे.
नांदेड शहरात व विशेषतः ग्रामीण भागात कोरोना ची लागण मोठ्या प्रमाणात होत आहे कोरोनाग्रस्त रुग्ण हे नांदेडच्या शासकीय व खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत या उपचार घेणाऱ्या रुग्णांना रेमडीसीवर इंजेक्शन व गंभीर रुग्णांना ऑक्सिजन ची गरज भासत आहे व हे रेमडीसीवर इंजेक्शन बाजारात उपलब्ध नाही व ऑक्सिजन चा तुटवडा ही आहे.
त्यामुळे रुग्णांची प्रकृती चिंताजनक होत आहे तरी ही गंभीर बाब ओळखुन जिल्हा प्रशासनाने यामध्ये लक्ष घालत रेमडीसीवर इंजेक्शन व ऑक्सिजन तात्काळ उपलब्ध करून द्यावे.
तसेच अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र लस उपलब्ध नसल्यामुळे बंद आहेत विशेषतः नांदेड चे मुख्य रुग्णालय असणारे श्री. गुरू गोविंद सिंह रुग्णालय या ठिकाणी सुद्धा लस उपलब्ध नाही असे लसीकरण केंद्र लस मागवून घेऊन चालू करावे.
तर काही लसीकरण केंद्रावर लस देणे व कोरोना चाचणी करणे हे एकाच ठिकाणी होत आहेत. त्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका वाढू शकतो त्यामुळे लसीकरण व कोरोना चाचणी हे वेगवेगळ्या ठिकाणी करावेत जेणेकरून संसर्गाचा धोका कमी होईल अशीही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसिकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
तसेच जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांची भेट घेऊन कोरोना प्रतिबंधाकरिता करण्यात आलेले लॉकडाउन चे नियम आणखीन कडक करावेत व जागोजागी पोलीस बंदोबस्त ठेवून बिनकामी फिरणाऱ्यावर कार्यावही करावी व ग्रामीण भागातही पोलीस विभागामार्फत लक्ष घालावे अशी मागणी निवेदनाद्वारे पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली.
तरी यावेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशसरचिटणिस वसंत सुगावे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हासरचिटणिस डी. बी. जांभरूनकर, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशसरचिटणीस बाळासाहेब भोसीकर , नागनाथराव खेळगे आदी सदस्य उपस्थित होते.