राजेंद्र पाटील राऊत
अर्थमंत्री अजितदाद पवार यांनी मांडला वस्तुनिष्ठ व प्रामाणिक अर्थसंकल्प ; सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण
राजेश एन भांगे /युवा मराठा न्युज नेटवर्क
कोरोनाच्या महामारीमुळे राज्याची आर्थिक परिस्थिती विपरित आहे व उत्पन्नाचे स्त्रोत कमी झालेले आहेत.
केंद्र सरकारचे भरीव सहकार्य तर सोडाच पण राज्याच्या हिस्स्याचे पैसेही वेळेवर मिळत नाही.
अशा परिस्थितीतही एक चांगला, वस्तुनिष्ठ असा अर्थसंकल्प मांडल्या बद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार हे अभिनंदनास पात्र आहेत.
तर कुठेही बडेजाव नाही, पोकळ घोषणा नाहीत आणि सध्याची परिस्थिती लक्षात घेता सार्वजनिक आरोग्य सेवा, पायाभूत सुविधा, शेतकरी, महिला तसेच इतर गरजू घटक व क्षेत्रांसाठी आवश्यक त्या तरतुदी करण्याचे काम या अर्थसंकल्पात झाले आहे व त्याच अनुषंगाने महाराष्ट्राच्या सर्व विभागांना व घटकांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केला आहे.
मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या ७ हजार कोटी रूपयांच्या नांदेड – जालना महामार्गाची अर्थसंकल्पात घोषणा केल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.
असे यावेळी बोलताना नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले.